दररोज घामाची धारा वाहणाऱ्या मुंबईकरांना पाण्याचे टेंशन नाही

अजून तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा तलावात
मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रामध्ये गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा चांगला पाणी साठा उपलब्ध आहे अजून पुढे तीन महिने पाणी साठा पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याने सध्या कडक उन्हाळ्यात घामाचा धारा वाहना-या मुंबईकरांना पाण्याचे टेन्शन मिटले आहे पाऊस उशिरा पडला तरी मुंबईकर नागरीकांना चिंता नाही

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून या मुंबईकरांना पालिका मोडक सागर , तानसा , विहार, तुळशी , भातसा , अप्पर वैतरणा , मध्य वैतरणा या सात तलावातून दररोज 3 हजार 750 दक्षलक्ष लिटर पाणी पुरवठा करत आहे हे मुबलक पाणी पुरवठा करत असताना मुंबईकरांची 4 हजार 200 दक्षलक्ष लिटर पाण्याची मागणी करत आहेत 3 हजार 750 दक्षलक्ष लिटर पाणी देत असताना 25 ते 30 टक्के म्हणजेच सुमारे 900 लिटर्स पाणी गळती व चोरीमुळे वाया जात आहे पालिका दरवर्षी करोडो रुपये पाण्यावर खर्च करत असतानाही पाण्याची चोरी आणि गळती थांबवण्यास यश आलेले नाही गेल्या दोन वर्षापूर्वी पडलेल्या अपु-या पावसामुळे गेल्या वर्षी मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी बाणीची परिरि-थती निर्माण झाली होती वषॅभर पाणी कपातीचा सामना मुंबईकरांना करावा लागला होता मात्र गेल्या वर्षी तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने यंदा पाण्याचे टेंशन दूर झाले आहे मधल्या काळात मध्य वैतरणा जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे मुंबईला होणाऱ्या पाणी पुरवठयात वाढ झाली आहे त्यामुळे मुंबईला दररोज तीन हजार 750 दक्षलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात आहे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड व कडक उष्णता वाढली असून घामाच्या धारा वाहत आहेत मात्र मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत नाही हाच मुंबईकरांना मोठा दिलासा आहे सध्या या सातही तलावात मिळून 3 लाख 62 हजार 949 दक्षलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे पुढील तीन महिने मुंबई करांची तान भागेल एवढा जलसाठा शिल्लक आहे हा जलसाठा असल्याने जुलै पयॅत पाण्याची चिंता मुंबईकरांना नाही हे पालिका जल विभागाच्या अहवालानुसार पष्ट होत आहे पाऊस जरी उशिरा पडला तरी मुंबईकरांना टेंशन नाही एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीची कुऱ्हाड कोसळणार नाही यावरून पष्ट होत आहे

गेल्या तीन वर्षांतील तलावातील साठा
( दक्षलक्ष लिटर मध्ये )

वषॅ तलावातील साठा

2017 3 लाख 62 हजार 949

2016 2 लाख 37 हजार 509

2015 2 लाख 92 हजार 833

सध्या तलावात असलेला पाणी साठा

तलावाचे नाव यंदा गेल्या वर्षी तलाव पूर्ण भरण्याची (2017) (2016) क्षमता
( दक्षलक्ष लिटर मध्ये)

मोडक सागर 63330 16396 128925

तानसा 41767 37890 145080

विहार 8177 4820 27698

तुळशी 2931 2936 8046

अप्पर वैतरणा 10949 00000 227047

भातसा 157388 104651 717037

मध्य वैतरणा 78407 70815 193530
-----------------------------------------------------
ऐकून 362949 237509 1447363

-------------------------------------------------------

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget