मुंबई, गुरुवार (प्रतिनिधी)- पालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष अर्ज भरणा-या 26 बंडखोरांना शिवसेनेन बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. पक्षविरोधी कारवाई व प्रचार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. निवडणुकीचा प्रचाराच्या रणधुमाळीला जोर आला असतनाचा बंडखोरांवर कारवाई झाल्याने याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.
पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने नाराज होऊन स्वपक्षातच अपक्ष अर्ज भरून तब्बल 26 उमेदवारांनी बंडखोरी केली. शिवसेना उपनेते, एक विद्यमान नगरसेविका आणि दोन माजी नगरसेवकांसह २६ बंडखोरांचा समावेश आहे. प्रभादेवी येथील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना 194 मधून उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेले शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश सावंत यांनी बंड पुकारले. तर विद्यमान नगरसेविका मंजू कुमरे, माजी नगरसेवक मोहन लोकेगावकर, अमोल नाईक, सतीश देसाई, तुळशीराम शिंदे, श्रीधर खाडे, ज्ञानेश्वर सावंत, नम्रता मिस्त्री, डॉ. राजेंद्र निकम, जीविती धुरी, सुभाष सावंत, श्वेता माने, सुरेखा चव्हाण, सुनील मोरे, स्नेहल मोरे, नवनाथ शेजवळ, कविता फर्नांडिस, रमा काशिद, प्रतिक्षा पवार, नंदू तांबे, सुमित शेट्ये आणि एकनाथ पवार तसेच शिवसेनेचे उपनेते दशरथ शिर्के, माजी नगरसेविका शुभांगी शिर्के आणि विभागप्रमुख सुधीर मोरे यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईनंतर शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांविरोधात प्रचार करून मतांचे विभाजण करण्यावर या बंडखोरांचा भर राहणार आहे.
Post a Comment