शेवटच्या दिवशी सुमारे दोन हजार ‘आॅफलाईन’ उमेदवारी अर्ज दाखल - ८०४१ ‘आॅनलाईन’अर्जांची नोंद

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या २१ फेब्रुवारी रोजी होणा-या निवडणुकीसाठी शुक्रवारी शेवटच्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत एकूण एक हजार ९८८ ‘आॅफलाईन’ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर आठ हजार ०४१ आॅनलाईन अर्जांची नोंद झाली आहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत दोन हजार ३२४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. २७ जानेवारीपासून अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली असून, गेल्या सात दिवसांत ६२२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. ३ फेब्रुवारी रोजी अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिवस होता. 

गुरुवारी सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीवरुन नाराजी आणि बंडाचे झेंडे फडकवले गेल्याने नेतेमंडळी संबंधित उमेदवारांची नाराजी दूर करण्यात गुंतले होते. त्यात काहींना यश आले असले तरी, नाराज उमेदवारांची मने वळवण्यासाठी रात्री उशीरापर्यंत नाकदू-या काढण्याचे काम सुरु होते. शुक्रवारी अर्ज भरण्याची अखेरची मुदत असल्याने सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पक्षांतर्गत कोणताही दगाफटका होऊ नये याची पूरेपूर काळजी घेतली होती. रात्री उशीरापर्यंत १७ वॉर्डांत एकूण एक हजार ९८८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, तर उर्वरित सहा वॉर्डांमधील उमेदवारी अर्जांच्या गणनेचे काम सुरु होते.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget