मुंबई : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष मनोज आखरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पाच जणांची कोअर कमिटी स्थापन करण्यात आली असून त्यांच्यावर निवडणुकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबईचा विकास व्हावा म्हणून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. गेल्या अनेक वर्षांत विकास झालेला नाही. शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करणो हा आमचा हेतू आहे. पालिका निवडणुकांसाठी कुठल्याही पक्षाने प्रसिद्ध केला नाही, असा जाहीरनामा आमचा असेल आणि महापुरुषांचा विचारांना मानणारा समाज आमच्या बाजूने नक्की असेल, अशी आम्हाला आशा असल्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले. सुधीर भोसले हे मुंबईचे निरीक्षक म्हणून, तर संतोष परब हे प्रचार प्रमुख म्हणून मुंबईची जबाबदारी पार पाडणार आहेत. तसेच अमोल जाधवराव, सुहास राणे आणि अजय यादव यांची या कमिटीमध्ये महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.
Post a Comment