सोमय्यांच्या पत्नी पालिका निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई : मुंबई महापालिकेतील माफियाराजविरोधात आवाज उठवणारे भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या पत्नी मेधा ओक-सोमय्या पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या दादर येथूनच निवडणूक लढवणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र, युती न झाल्यास आणि पक्षाने उमेदवारी दिल्यास शिवसेना-भाजपाची ही लढाई रंगतदार ठरणार आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपा युतीबाबत अद्यापि निर्णय झाला नसला तरी काही महत्त्वाच्या प्रभागात तगडा उमेदवार उभा करण्याची तयारी केली आहे. यामध्ये काही मातब्बर उमेदवार किंवा ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, अशांना उमेदवारी देण्याचा विचार केला असल्याचे समजते. मागील वर्षभरात सत्तेत असतानाही भाजपाने पालिकेतल्या माफियाराजविरोधात भूमिका घेऊन शिवसेनेला टार्गेट केले आहे. पालिकेतल्या माफियाराजविरोधात किरीट सोमय्या यांनी दसर्‍याच्या दिवशी पालिकेतील भ्रष्टाचाररूपी रावणाच्या दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यक्रमात शिवसैनिकांनी धुडगूस घालत तो उधळून लावला होता. त्या दिवसापासून किरीट सोमय्या व शिवसेना यांच्यातील संघर्ष अधिकच पेटला. त्यामुळे माफियाराजच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आपल्या पत्नीलाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget