मुंबई भाजपाची निवडणूक समिती जाहीर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपाच्या २९ सदस्यीय निवडणूक समितीची घोषणा रविवारी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी केली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह राज्याचे मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार आणि भाजपाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचा यामध्ये समावेश आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी, व्यवस्थापन, प्रचार साहित्य वाटप, प्रचारसभा तसचे उमेदवार निवड आणि जाहीरनामा प्रकाशनासह निवडणुकीतील सर्व कामाच्या दृष्टीने ही समिती महत्त्वाची मानली जाते. मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून त्यामध्ये एकूण २९ सदस्यांचा समावेश आहे.

या समितीमध्ये संघटन मंत्री सुनील कर्जतकर यांच्यासह केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता, विद्या ठाकूर यांच्यासह खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन तसेच आमदार अतुल भातखळकर, मंगलप्रभात लोढा, भाई गिरकर, राज पुरोहित, योगेश सागर, मुंबई भाजपा महामंत्री सुनील राणो, अमरजीत मिश्रा, सुमंत घैसास, महिला मोर्चा अध्यक्षा शलाका साळवी, महापालिका गटनेते मनोज कोटक या मुंबईच्या पदाधिकार्‍यांसह प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, शायना एन. सी., संजय उपाध्याय, संजय पांडे, तर प्रवक्ते म्हणून आमदार राम कदम, अतुल शाह, मधु चव्हाण यांचा समावेश आहे, तर प्रतापभाई आशर आणि कांताताई नलावडे या ज्येष्ठ सदस्यांचाही या समितीमध्ये समावेश आहे, अशी माहिती या समितीमधील प्रवक्ते माजी आमदार अतुल शाह यांनी दिली.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget