एमआयएम मुंबई पालिकेत ७६ जागा लढवणार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएम २२७ पैकी ७६ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. ओवेसी बंधूंच्या उपस्थितीत ३0 सभाही घेण्याचे ठरले आहे. मुंबई महापालिकेत प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने समाजवादी आणि अखिल भारतीय काँग्रेस या मुस्लिम मतदारांचा पाठिंबा असणार्‍या दोन्ही पक्षांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
एमआयएमने मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी चालवली आहे. आतापर्यंत ओवेसी बंधूंच्या उपस्थितीत दोन सभाही पार पडल्या आहेत. २२७ नगरसेवकांच्या मुंबई महापालिकेत काँग्रेसचे ५२ आणि समाजवादी पक्षाचे ९ नगरसेवक आहेत. एमआयएमने मुस्लिमबहुल भागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात मालवणी, कुर्ला, भायखळा, नागपाडा या भागांचा समावेश आहे. आजपर्यंत येथून सपा आणि काँग्रेसचे नगरसेवक निवडून येत होते. मुंबईतील मुस्लिम युवकांत एमआयएमसंदर्भात उत्सुकता आहे. त्यात एमआयएम दलित कार्ड खेळणार आहे. तिकीट वाटपात दलित उमेदवारांना प्राधान्य देण्याचे पक्षाने ठरवले आहे. त्यामुळे सेना, भाजपावगळता इतर पक्षांना एमआयएमचा मोठा धसका वाटत आहे. मुंबई महापालिकेला देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पाहिले जाते. नेमका तोच मुद्दा एमआयएम उचलणार आहे. आजपर्यंत युतीने झोपडपट्टी आणि मुस्लिम वस्त्यांना निधी देण्यात दुजाभाव केल्याचा मुद्दाही एमआयएम प्रचारात उपस्थित करणार असल्याचे एमआयएमच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. दरम्यान, एमआयएमचा फटका काँग्रेस, सपा व राष्ट्रवादीला बसणार आहे. मात्र, याचा फायदा आपोआप शिवसेना, भाजपाच्या उमेदवारांना होण्याची शक्यता आहे. भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांचे ओवेसी बंधूंच्या भाषणाकडे बारीक लक्ष आहे. एमआयएमचे नेते जितकी वादग्रस्त विधाने करतील, जितका जहाल प्रचार करतील तितका सेना-भाजपाला हवाच आहे. कारण त्यामुळे मतांचे ध्रुवीकरण होण्यास मदत होईल, अशी चर्चाही राजकीय वतरुळात आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget