बॉलिवूडचा अभिनेता इरफान खान याला गंभीर आजारानं पछाडलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो काहीसा अज्ञातवासात होता. विशेष म्हणजे तो त्याचा येणारा आगामी चित्रपट ब्लॅकमेलच्या प्रमोशनलाही उपस्थित नव्हता. यासंदर्भात इरफानच्या ट्विटवरून त्याला कोणत्या तरी भयंकर आजाराने पछाडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे त्याचे चाहतेही उदास आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी इरफान खानला कावीळ झाल्याची बातमी झळकली होती. तेव्हाही याची कल्पना इरफाननं ट्विटरच्या माध्यमातूनच दिली होती. इरफान खान आजारी असल्यानं त्याची शूटिंगदेखील रद्द करण्यात आली आहे. त्याच्या या ट्विटमुळे आता त्याच्या चाहत्यांच्या इरफानच्या प्रकृतीची चिंता सतावू लागली .
Post a Comment