गेल्या अनेक वर्षापासून वंचित असलेल्या दहिसर येथील हजारो लोकांना पालिका देणार मुबलक पाणी


र-थायी समितीच्या मंजुरी साठी प्रस्ताव दाखल
मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – गेल्या अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित असलेल्या दहिसर येथील खासगी जमिनीवर उभ्या असलेल्या गणपत पाटील नगरला मुबलक पाणी देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे तसा प्रस्ताव पालिकेने तयार करून तो पालिका स्थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर केला आहे उद्या बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे र-थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर पालिका प्रशासन याची अंमलबजावणी करणार आहे त्यामुळे लवकरच या लोकांना मुबलक पाणी मिळणार आहे

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या मुंबापुरीत सुमारे दिड कोटी जनता राहत आहे यामध्ये 65 टक्के लोक झोपडपट्टी मध्ये राहत आहे या लोकांना पालिका दररोज 3 हजार 750 दक्षलक्ष लिटर पाणी पुरवठा करत आहे मात्र दहिसर येथील हजारो लोक पाण्यापासून वंचित होते या गणपत पाटील नगरमध्ये खासगी जमिनीवर 9 हजार 668 घरे आहेत. सन 1995 च्या धोरणानुसार पालिकेने 32 अधिकृत जलजोडण्या दिल्या. मात्र त्यानंतर 2000 नंतरच्या झोपड्यांना पाणी पुरवठा करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. या निर्देशानुसार पालिकेने पाणी धोरण तयार केले. यात खासगी जागेंवरील झोपड्यांना वगळले. परिणामी खासगी झोपड्यांना पाणी देण्यास अडचण निर्माण झाली होती. यामुळे खासगी जागेंवरील हजारो झोपड्या पाण्यावाचून वंचीत राहिल्या होत्या या झोपड्यांना पाणी मिळावे, यासाठी दहिसरमधील स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र व्यवहार करुन पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. महापौरांनी हे प्रकरण निकाली काढण्यासाठी स्थायी समितीला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. या निर्देशानुसार पालिकेने याबाबतचा प्रस्ताव तयार करुन स्थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर केला आहे उद्या बुधवारी होणाऱ्या र-थायी समितीत चचाॅ केली जाणार आहे र-थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर पालिका त्याची अंमलबजावणी करणार आहे मात्र लवकरच या लोकांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे गणपत पाटील नगरमध्ये 14 गल्ल्या आहेत. प्रत्येक गल्लीत पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे प्रत्येक टँकरसाठी झोपडीधारकांना दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत शिवाय पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी पालिकेने मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि महापौरांनी सुचविलेल्या पर्यायानुसार झोपडीधारकांना पाणी पुरवठा करावा, अशी मागणी घोसाळकर यांनी केली होती त्या प्रमाणे महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीत जमिनीच्या मालकांनी परवानगी दिल्यास पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी अट परिपत्रकात समाविष्ट करावी, असे निर्देश महापौरांनी दिले होते या लोकांना पाणी मिळाल्यानंतर मोठा दिलासा पालिका प्रशासनाकडून मिळणार आहे





Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget