मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी बेस्ट आता नविन नविन पयाॅय शोधत आहे आर्थिक दृष्ट्या करोडो रुपयांना खड्ड्यात घालणाऱ्या वातानुकूलित किंग लॉन्ग बसगाड्या बंद केल्यानंतर बेस्ट ने आता नियमित वातानुकूलित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ५० मिनी वातानुकूलित बसगाड्या घेण्याचे ठरविले असून या बसगाड्या बेस्ट स्वतः विकत घेणार नसून तर भाडेतत्वावर घेणार आहे . त्यामुळे बेस्ट ला यात आर्थिक गुंतवणूक करावी लागणार नाही . या बसगाड्या वाहकाविना धावणार असल्याने बेस्ट ची मोठी आर्थिक बचत होणार आहे .या बस मधून प्रवास करताना प्रवाशांसाठी तिकिटासाठी वेगळे तंत्रज्ञान हि कंपनी वापरणार आहे बस मधील आसन आरक्षित करण्यासाठी वेगळे अॅप सुद्धा निर्माण करण्यात येणार आहे
बेस्ट या ५० वातानुकूलित ट्रॅव्हलर स्मार्ट सिटी बसगाड्या एम पी एंटरप्राइज या कंपनीकडून घेणार असून त्याकरिता ५ वर्षांसाठी करार करणार आहे असून बेस्ट तब्बल ५ वर्षांसाठी बेस्ट ५० कोटी ६२ लाख १७ हजार रुपये मोजणार आहे . या बसगाड्यांमध्ये २१ आसने असून फोर्स मोटर्स च्या मिनी बसगाड्या यासाठी वापरल्या जाणार आहेत या भाडेतत्त्वावरील बसगाड्या बेस्ट प्रतिमहिना ४५५० किमी चालवणार असून बेस्ट च्या बस आगारांमधूनच इंधन भरण्यात येणार आहे,
आतापर्यंत बेस्ट ज्या वातानुकूलित बसगाड्या चालवत होती त्यासाठी बेस्ट ला प्रतिकिलोमीटर १७८ रुपये खर्च करावा लागत होता व बेस्टला प्रतिकिलोमीटर २८ रुपयेच मिळत होते १५० रुपये प्रतिकिमी तोटा होत होता .मात्र या मिनी बसगाड्या घेतल्याने बेस्ट ला फक्त प्रति कि मी ४५ रुपये खर्च येणार आहे. असा बेस्ट चा दावा आहे जे प्रवासी नियमित वातानुकूलित बसने प्रवास करीत होते त्यांना एक चांगला पर्याय निर्माण होणार असल्याचेही बेस्टने दावा केला आहे. काही महिन्यांपूर्वी बेस्ट ने ५००० किमी बस चालविण्यासाठी प्रस्ताव मागवला होता . त्यासाठी हि ५१ रुपये प्रति किमी असा दर त्या कंपनीकडून प्राप्त झाला होता . मात्र या बसगाड्या केंद्र सरकारच्या एस एस आर टी यु च्या परिपत्रक दराच्या अंतर्गत घेणार असून कोणत्याही निविदा न मागवता घेण्यात येणार आहे या बसगाड्याना बसवाहक नसणार आहे तर बस प्रवाशांना बसगाडीमध्ये प्रवेश करताना त्यांचे आर एफ -आय डी कार्ड टॅप करून त्याचे उतरण्याचे ठिकाण दर्शविणार आहे. त्याची माहिती वेळ , ठिकाण , वापरण्याची माहिती . ओळख इत्यादी माहिती वेलिडेटरवर साठविण्यात येणारे आहे, व त्याचवेळी मध्यवर्ती सर्वर वर अपलोड करण्यात येतील. प्रवाशी जर का बसस्टोपच्या जर अगोदर उतरला तर त्याचे बाकीचे पैसे आपोआप त्याच्या कार्डवर जमा होणार आहेत त्या प्रवाशाने जर पूर्ण प्रवास केला तर त्याचे पूर्ण पैसे वळते होणार आहेत याशिवाय या बसगाडीचे बस आसन जर आगाऊ आरक्षित करायचे असेल तर त्या साठी एक वेगळे अॅप सुद्धा हि कंपनी प्रवाशांसाठी उपलबध करून देणार आहे.
Post a Comment