मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – ठाणे, कांदिवली, मालाड, नवी मुंबई येथील गृहप्रकल्पना मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी पसंती दर्शविल्यानंतर मुंबई उपनगर मुलुंड पूर्व येथे बांधकाम व्यवसायात विश्वासाचे नाव असलेल्या धनलक्ष्मी बिल्डर अँड डेव्हलपर यांनी उच्च मध्यम वर्गीयांसाठी आपल्या केशव निवास या नव्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. '' मुलुंड पूर्व येथे हा ९ मजली प्रकल्प असून २ बीएचके आणि ३ बीएचके या प्रकारात येथे सदनिका उपलब्ध आहेत, या ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धतीत सदस्य राहू शकतील अशा प्रकारची सदनिकेची रचना केली असून सामान्यांचे मुंबईतच राहायचे स्वप्न हि साकार होणार आहे '' अशी माहिती धनलक्ष्मी बिल्डर अँड डेव्हलपर चे संचालक बी. एन. गुप्ता यांनी दिली. ठाणे आणि नवी मुंबई येथेही परवडणारी घरे हि संकल्पना नष्ट होत असतानाच मुलुंड सारख्या उच्चभ्रू वसाहतीत आपल्या स्वप्नातील घर घेणे आता आवाक्यातील झाले आहे.
मध्य मुंबईत मुख्यत्वे कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, या ठिकाणी अनेक गृहनिर्माण प्रकल्प बनत आहेत. मात्र बजेट असतानाही काही ग्राहकांना आपला मुक्काम ठाणे किंवा कल्याण येथे हलवावा लागतो , मात्र कामाच्या निमित्ताने मुंबईत येणार्यांना प्रवास आणि वाहतुकीचा सामना करावा लागतो. या सर्व बाबी लक्ष्यात घेऊन धनलक्ष्मी बिल्डर ने मुलुंड येथे केशव निवास हा गृहनिर्माण प्रकल्प साकारलेला आहे. या गृहप्रकल्पाची वैशिष्ठे म्हणजे मुलुंड रेल्वे स्टेशन पासून केवळ १५ मिनिटे अंतरावर असलेला हा गृहनिर्माण प्रकल्प सभोवताली हिरवळीने नटलेला आहे. या ठिकाणी असलेली निरव शांतता आणि नैसर्गिक खेळती हवा हे या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट म्हणावे लागेल. सोबतच २४ तास सुरक्षा, २४ तास पाणी, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, पाईप गँस, प्रत्येक सदनिकेला व्हिडीओ डोअर सेक्युरिटी, वाय फाय, या सुविधेसह, उच्च प्रतीचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच इमारत हि संपूर्ण भूकंप रोधक असून २४ तास पाण्याची सोय व्हावी यासाठी या प्रकल्पात वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुद्धा राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाविषयी www.dhanlaxmibuilder.com या संकेत स्थळावर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Post a Comment