अरब जगतातील आघाडीच्या भारतीय नामवंतांच्या यंदाच्या यादीत ३२ वे मानांकन
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय (जय) दातार यांना फोर्ब्ज मिडल इस्ट मासिकातर्फे नुकतेच टॉप इंडियन लीडर्स इन द अरब वर्ल्ड २०१७ – रीटेल ॲवॉर्ड पुरस्काराने गौरवण्यात आले. अरब जगतातील आघाडीच्या भारतीय नामवंतांच्या या प्रतिष्ठित यादीत डॉ. दातार यांना ३२ वे मानांकन मिळाले आहे. जगातील अत्यंत विश्वसनीय माध्यम गृहांपैकी असलेल्या फोर्ब्ज मिडल इस्टने कार्याची दखल घेणे, हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया मसाला किंग या लोकप्रिय नावाने ओळखल्या जाणाऱ्या डॉ. दातार यांनी व्यक्त केली आहे.
यंदा सलग पाचव्या वर्षी फोर्ब्ज मिडल इस्टतर्फे या शानदार पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अरब जगताच्या प्रगतीची आकांक्षा बाळगून योगदान देणाऱ्या आघाडीच्या भारतीयांची बहुप्रतिक्षीत यादी फोर्ब्ज मिडल इस्टने यानिमित्त जाहीर केली आणि दुबईतील द वेस्टइन दुबई मीना सेयाही बिच रिसॉर्ट अँड मरीना येथे झालेल्या समारंभात या नामवंतांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. भारताचे संयुक्त अरब अमिरातीतील (युएई) कौन्सुल जनरल हिज एक्सलन्सी श्री. विपुल कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.आपली दूरदृष्टी व गुंतवणूक या माध्यमातून अरब जगताला आकार देणाऱ्या ताकदवान व प्रभावी भारतीय व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेला हा समारंभ अत्यंत प्रतिष्ठित आणि लोकप्रिय कार्यक्रमांपैकी आहे. या उद्योजकांनी त्यांची दूरदृष्टी, सच्चेपणा आणि नेतृत्वशक्ती वापरुन पश्चिम आशियात अत्यंत यशस्वी कंपन्या स्थापन केल्याच, परंतु त्यातून भागधारक व या प्रदेशांच्या अर्थव्यवस्थांसाठी भांडवल उभारणीही केली आहे, असे फोर्ब्ज मिडल इस्टच्या प्रवक्त्याने बोलून दाखवले.
अरब जगतात वास्तव्य करणाऱ्या किंवा उद्योग चालवणाऱ्या भारतीय व्यावसायिकांबाबत सखोल संशोधन व विश्लेषण केल्यानंतर त्यांना मानांकन देऊन प्रतिष्ठित यादी तयार केली जाते. फोर्ब्ज मिडल इस्ट मासिक व्यावसायिक माहिती व सहयोगासाठी प्रमुख संर्दभ बिंदू म्हणून भूमिका बजावते, या प्रदेशातील उद्योगक्षेत्रांतील निर्णयकर्ते व गुंतवणूकदारांना सहकार्य करते आणि अरब जगतातील आर्थिक प्रगतीला चालनाही देते. त्यांचा हा पुढाकार जागतिक अर्थव्यवस्थेसाठीही उत्तम फलित निर्माण करणारा आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना डॉ. दातार म्हणाले, “ सन्मान व गौरव आपल्यावरील जबाबदारी आणखी वाढवतात. आम्ही सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून आमच्या ग्राहकांना वर्धित मूल्य पुरवण्यासाठी यापुढेही मेहनत करु, हा ठाम विश्वास आहे. या पुरस्काराबद्दल मी फोर्ब्ज मिडल इस्टचा आभारी आहे. हा गौरव म्हणजे आमच्या संपूर्ण संघटनेच्या समर्पित सांघिक प्रयत्नांचेच प्रतिबिंब आहे. मी या महान देशाच्या राज्यकर्त्यांचाही आभारी आहे, ज्यांनी आमच्या प्रयत्नांना कायम पाठबळ पुरवले. जगातील आघाडीचे उद्योजक व व्यवसायांचे मालक हे संयुक्त अरब अमिरातीत स्थित आहेत, हेच युएईच्या राज्यकर्त्यांच्या आम्हाला मिळत असलेल्या सहकार्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब आहे.डॉ. धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली प्रगती करणाऱ्या अल अदील ट्रेडिंगने ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत उपलब्ध करुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजघडीला अल अदील ग्रुपची आखाती देशांत ३६ सुपरमार्केट्स, दुबई, अबूधाबी, शारजा व अजमान भागात २ पीठाच्या गिरण्या, २ मसाला उत्पादन कारखाने असे नेटवर्क विस्तारले आहे आणि मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या नावाने मुंबई निर्यात विभागही कार्यरत आहे. अल अदील समूह सक्रिय विस्तार साधत असून त्याने नुकतेच ओमान व बहारीनमध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. कंपनीने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनया, स्वीत्झर्लंड, इटली व एरित्रिया त्याचप्रमाणे कुवेत, ओमान व युएई या देशांत व्यापारी मार्ग निर्माण करुन विशेष वर्गातील आस्थापनांद्वारे आयात व निर्यात क्षेत्रांतही विस्तार केला आहे.
Post a Comment