सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिकेला धरले धारेवर
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पावसाचे दिवस तोंडावर आले असताना मुंबईतील नाले सफाईची कामे कासवगतीने सुरू असल्या प्रकरणी पालिका र-थायी समितीत बुधवारी चांगलेच पडसाद उमटले सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेला धारेवर धरत आहेत ही कामे कधी होणार असा जाब विचारत कोटयावधी रुपये पाण्यात घालणार आहेत का असा सवाल नगरसेवकांनी विचारला अखेर पालिकेने नमते घेत चक्क सहावेळा निविदा काढूनही कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला नाही, अशी कबुली देत पावसापूर्वी नाले सफाईची कामे मार्गी लावली जातील असे आश्वासन प्रशासनाने दिले.
मुंबईत पालिकेने नाले सफाईचे काम सुरू केले आहे या कामासाठी पालिका कोट्यावधी रुपये खर्च करणार आहे मात्र या नालेसफाईसाठी पालिकेला कंत्राटदार मिळत नसल्याने नाले सफाईची कामे रखडली आहेत पालिका जी- साऊथ, जी /नॉर्थ, एफसाऊथ, एफ- नॉर्थ मधील मोठ्या नाल्यांसाठी प्रशासनाने सहावेळा तर छोट्या नाल्यांसाठी चारवेळा निविदा काढण्याची वेळ प्रशासनावर आली. तर नाल्यातील गाळ काढून त्याची वाहतूक करण्यासाठीही प्रशासनाला दोन वेळा निविदा काढावी लागली. अशाप्रकारे नालेसफाईच्या कामांना उशिर का झाला याची कबूली प्रशासनाने दिली. छोट्या नाल्यांचे काम एनजीओ मार्फत केले जाते आहे. इतर ठिकाणीही कामे अपूर्ण आहेत. आतापर्य़ंत फक्त 10 टक्केच नालेसफाई झाली असेल तर पावसापूर्वी कामे कशी पूर्ण होणार असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी विचारला. त्यावर छोट्या नाल्यांची कामे एनओमार्फत केली जात आहेत. ज्या नाल्याच्या ठिकाणी मशिन नेता येणार नाही, अशा ठिकाणी एनजीओमार्फत काम करावेच लागेल. कंत्राटदार मिळत नसतील तर तेथेही एनजीओतर्फे कामे केली जातील असे प्रशासनाने स्पष्ट केले. नाले सफाईची कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासनही प्रशासनाने दिले. एफ नाॅर्थमध्ये एकाही नाल्यावर टेंडर नाही. सगऴी कामे मनुष्यबळाचा वापर करून होणार नाही, याकडे शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी लक्ष वेधले. तर साकीनाका क्रमांक 10,11 व 13 या नाल्यांच्या ठिकाणी मशिन उतरवणे अशक्य आहे. तेथे एनजीओला कामे द्यायलाच हवी असे दिलीप लांडे म्हणाले. मोठे नाले व छोटे नाले यांची कामे रेंगाळली आहेत, ही कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर यंदाही नाले तुंबण्याची भीतीही नगरसेवकांनी पालिका र-थायी समितीत व्यक्त केला
Post a Comment