पालिका स्थायी समितीत शिवसेनेची कोंडी
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – हरीत लवादाने दगडखानी बंद केल्याने मुंबईतील रस्त्यांच्या कामासाठी खडी मिळत नाही. खडीचा पुरेसा साठा नसल्याने रस्त्यांची कामे करता येत नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने व्यक्त केली. याप्रकरणी शिवसेनेला अडचणीत आणण्याचे भाजपचे षढयंत्र असल्याचा आरोप शिवसेनेच्या सदस्यांनी केला. यासाठी मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप सेनेने केला तर बेकायदेशीर कामे कायदेशीर करण्यासाठी मुख्यमंत्र्याना मधे का आणता असा प्रश्न भाजपाच्या सद्स्यानी उपस्थित करत शिवसेनेची चांगलीच कोंडी केली.
मुंबईतील रस्त्यांच्या कामाचा प्रस्ताव मंजूरीसाठी आला होता. त्यावर शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दगडखानी बंद केल्यामुळे रस्त्यांची कामे रखडल्याची कबूली प्रशासनाने दिली. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि खडीचा तुटवडा होत असल्याने दगडखाणींचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली. त्यांच्या समवेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित होते. त्यामुळे दगडखाणींचा विषय मार्गी लागेल, खडीचा पुरवठा झाल्यास रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लागतील, असा विश्वास रस्ते अभियंत्यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केल्याने भाजपचे नगरसेवक संतप्त झाले. दगडखाणी बंद केल्याने रस्त्यांची कामे रखडल्याचे खापर तुम्ही मुख्यमंत्र्यांवर फोडू नका, अशी भुमिका घेत शिवसेनेला भाजप गटनेते मनोज कोटक यांनी खिंडीत गाठले. पर्यावरण मंत्र्यांना तुम्ही का भेटत नाही असा सवालही त्यांनी शिवसेनेला केला. त्यावर दगडखाणी बंद करण्यासाठी हीच वेळ का निवडण्यात आली असा सवाल करीत पालिकेचे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी हा प्रकार शिवसेनेला बदनाम करण्याचे षढयंत्र असल्याचा आरोपच केला. मुंबईकरांना चांगल्या सुविधा मिळू नये म्हणून शिवसेनेची कोंडी करण्याचा हा डाव असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच चकमक झडल्याचे चित्र दिसले. आपण कंत्राटदाराची बाजू घेवून बोलत आहात, काय असा आरोप सपाचे रईस शेख यांनी सभागृहनेत्यांवर केला. भाजप आणि विरोधकांनी
मिळून शिवसेना एकाकी पाडल्याचे चित्र समितीच्या बैठकीत दिसले.
निविदेतील अटीं कंत्राटदारांना राहणार बंधनकारकरस्ते कामात दिरंगाई करणाऱ्या काही कंत्राटदारांवर गुन्हे दाखल केले आहे. 11 कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीसा दिल्या आहेत दिल्या असल्याची माहिती रस्ते अभियंत्यांनी दिली. ज्या कंत्राटदारांना रस्त्यांची कामे
दिली आहेत. त्यांच्याकडून निविदेतील अटी आणि शर्थीनुसार रस्त्यांची कामे करून घेवू दगडखाणी बंद झाल्या तरी त्यांनी कुठूनही खडी आणावी आणि रस्त्यांची कामे वेळेत करावीत, ती कामे वेळेत पूर्ण केली जातील अशी भुमिका प्रशासनाने स्थायी समितीत मांडली.
Post a Comment