निष्ठावंत आणि कट्टर शिवसेनिकांमुळेच परळ-लालबागचा गड अमेध- महापौर विश्वनाथ महाडेश्वर

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – निष्ठावंत आणि कट्टर शिवसेनिकांमुळेच परळ-लालबागचा गड शिवसेनेने कायम राखला असे प्रतिपादन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिवसैनिकांच्या सन्मान सोहळ्यात केले. यावेळी चार वर्षांनी प्रथम अंतिम फेरीत विजयी ठरलेल्या बॉस्केट बॉल संघाचे यशस्वी प्रतिनिधीत्व केलेल्या कर्णधार प्रशांत भांडळेकरचे महापौरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सुभाष डामरे मित्र मंडळ, परळ या संस्थेतर्फे विभागात निवडून आलेल्या शिवसेना नगरसेवकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे संस्थापक आनंद गावकर यांच्या संकल्पनेतून आमदार अजय चौधरी, सुनील कदम, पराग चव्हाण आणि राजन म्हाडगूत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आमदार सुनील शिंदे, सुनील राऊत यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम करण्यात आला. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृह नेता यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, स्थापत्य समिती अध्यक्ष विशाखा राऊत, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा सिंधू मसुरकर, माजी महापौर श्रद्धा जाधव आणि स्नेहल आंबेकर यांच्यासह नगरसेवक आशिष चेंबूरकर, अरविंद भोसले, मंगेश सातमकर,प्रह्लाद ठोबरे, दत्ता पोगडे, सचिन पडवळ, सदा परब, अमेय घोले, आत्माराम चाचे, उमेश माने, किशोरी पेडणेकर, उर्मिला पांचाळ, समृद्धी काते, स्मिता गावकर आणि अरुंधती दुधवडकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget