वीज मंडळातील कंत्राटी कामगार 22 मे पासून काम बंद आंदोलन करणार

महाराष्ट्र अंधारात बुडणार
मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – वीज मंडळात 32 हजार कंत्राटी कामगार गेली दहा वर्षे हे कामगार काम करीत आहेत, त्यांना मंडळाच्या सेवेत कायम करा आणि इतर मागण्यांसाठी येत्या 22 मे पासून राज्यव्यापी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटी आउट सिर्सिंग कामगार संयुक्त कृती समितीने दिला आहे, या आंदोलनामुळे महाराष्ट्र अंधारात बुडण्याची शक्यता आहे,

महाराष्ट्र राज्य वीजमंडळाच्या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कंत्राटी कामगार गेली पंधरा ते वीस वर्षे काम करीत आहेत, या कामगाराना कामगार कायध्यानुसार किमान वेतनही मिळत नाही, मासिक पाच ते सहा हजार रुपये इतके तुटपुंजे वेतन मिळत आहे, या कामगारांना कायम करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या रानडे समितीच्या अहवालाची अमलबजावणी करावी अशी मागणी कामगार कृती समितीचे नेते आण्णा देसाई, डॉ मोहन शर्मा यांनी दिली, राज्य शासनाने यावर निर्णयाचे घेतला नाही तर मंडळातील 97 हजार कामगार कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देतील अशी माहिती त्यांनी दिली, रिक्त पदावर कंत्राटी कामगारांना प्राधान्याने सामावून घ्यावे, अन्यथा कंत्राटी कामगार या आंदोलनाच्या माध्यमातून कामबंद आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत, उन्हाळ्याच्या दिवसात कामबंद झाल्यास महाराष्ट्र् अंधारात बुडेल असा इशाराही त्यांनी दिला, यावेळी पॉवर फ्रंटचे नचिकेत मोरे, वर्कर्स फेडरेशनचे कृष्णा भोयर, कंत्राटी कामगार संघाचे शरद संत, सिटूचे वामन बुटले, रोजंदार मजदूर सेनेचेदिलीप कोठारे आदी आठ संघटना कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी एकत्र आल्या आहेत,

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget