शिवसेनेचे नविन होणारे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे महापौरपद धोक्यात आणखी एक आरोप

मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिका महापौर पदावर निवड होण्यापूर्वीच शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांच्यापुढे अडचणी वाढल्या आहेत. महाडेश्वर यांनी नियमबाह्य रितीने पालिका निवडणूक लढवली असल्याचा आरोप मंगळवारी वॉर्ड क्रमांक 87 मधील काँग्रेसचे पराभूत उमेदवार धर्मेश व्यास यांनी केला आहे. त्यामुळे महाडेश्वर यांच्या विरोधात आणखी एका आरोपाची भर पडली आहे.

नियमांचा भंग करुन महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील सदनिका विकत घेतल्याचा आरोप वॉर्ड क्र. 87 चे अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी केल्यानंतर मंगळवारी याच वॉर्डातील काँग्रेसचे उमेदवार धर्मेश व्यास यांनीही महाडेश्वर यांच्यावर नियमबाह्य निवडणूक लढवल्याचा आरोप केला आहे. विश्वनाथ महाडेश्वर ज्या राजे संभाजी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत त्या शाळा/महाविद्यालयाला राज्य शासनाचे तसेच प्राथमिक शाळेला महापालिकेचे अनुदान आहे. मुंबई महापालिका कायदा १६ (१(A1) नुसार मुंबई महापालिकेकडून कोणतेही उत्पन्न मिळत असेल तर नगरसेवक पद रद्द करण्यात येते. महाराष्ट्र एम्प्लॉईज प्रायव्हेट स्कूल अँक्ट नुसार कलम ४२,४३ मध्ये जर शालेय कर्मचा-यांना कोणतीही निवडणूक लढवायची असेल तर पूर्वपरवानगी घेऊन रजेवर जाणे आवश्यक असते, याकडे व्यास यांनी लक्ष वेधले आहे. तसेच निवडणुकीच्या काळात महाडेश्वर यांनी पगार घेतला असल्याचा दावाही काँग्रेसचे उमेदवार धर्मेश व्यास यांनी केला आहे. या विरोधात व्यास यांनी लघुवाद न्यायालयात दाद मागितली असून 6 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे व्यास यांनी सांगितले. मुंबई महापौर निवडणूक 8 मार्च रोजी होत आहे. मात्र त्यापूर्वीच महाडेश्वर यांच्यावर अशा प्रकारे आरोप झाल्याने ते अडचणींना सामोरे कसे जातात याकडे सर्वांचेच लक्ष वेधले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget