मुंबई, सोमवार (प्रतिनिधी)- महापालिकेच्या विविध ५ रुग्णालयांत आचाऱ्यांच्या १९ जागा रिक्त आहेत. यामुळे रुग्णांच्या जेवणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून या रिक्त जागा प्रशासन कधी भरणार, असा प्रश्न सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला.
पालिकेच्या शहर, रुग्णालये, प्रसुतीगृहे आणि पी.एस.एम केंद्रांना गव्हाचे पीठ, तांदूळ यांचा पुरवठा करण्यासाठी ई-निविदा काढण्याबाबतचा विषय स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी रुग्णालयातील आचाऱ्यांबाबचा प्रश्न उपस्थित केला. रुग्णालयांतील रुग्णांना सकस आणि पौष्टिक अन्न मिळावे यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून पालिका रुग्णालयांमध्ये आचाऱ्यांची नेमणूक करण्यात येते. बाहेरून निकृष्ट दर्जाचे अन्न रुग्णांना देण्यापेक्षा रुग्णालयातील अचाराऱ्याकडूनच रुग्णांना सकस आहार मिळावा, हा यामागे हेतू आहे. परंतु, वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालय, सांताक्रुझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी आणि संत मुक्ताबाई रुग्णालय तसेच मुलूंडचे एम.टी अगरवाल रुग्णालय या पाच रुग्णालयांमध्ये २५ पैकी १९ आचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. तसेच पालिकेच्या कुठल्या रुग्णालयात थाळी पध्दत सुरू करणार तसेच कुठल्या रुग्णालयात आचारी ठेवणार याबाबत पालिका प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबतची माहिती घेऊन पुढील बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, पालिका अतिरीक्त आयुक्त आय.ए.कुंदन यांनी स्पष्ट केले.

Post a Comment