भाजपाने कायदेशीर पेच निर्माण करून महापालिकेची डोकेदुखी वाढवली

मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेतील कोणत्याही पदाची निवडणुक लढवणार नाही तसेच विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगणार नाही असे भाजपाने जाहिर केले असले तरी महापालिका नियमानुसार दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाशिवाय विरोधी पक्ष नेते पद द्यायचा कायदा नसल्याने कायदेशीर व घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. भाजपाच्या भूमिकेमुले कायदेशीर पेच निर्माण झाला असल्याने पालिका प्रशासन आणि चिटणीस विभागाची डोकेदुखी मात्र वाढवली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकिमध्ये शिवसेनेचे 84 तर भाजपाचे 82 नगरसेवक निवडून आले आहेत. सेना भाजपाची युती तुटल्याने भाजपाने पारदर्शकतेच्या मुद्यावर शिवसेनला पाठिंबा दिलेला नाही. भाजपाने आपले वेगले अस्तित्व दाखवण्यासाठी राजकीय खेळी खेळली आहे. महापौर किंवा कोणत्याही समितीचे अध्यक्ष पदाची निवडणुक लढवणार नाही. विरोधी पक्ष नेते पदही घेणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहिर केले.मुख्यमंत्री फडणविस यांनी जाहिर केल्या प्रमाणे महापौर आणि इतर अध्यक्ष पदाची निवडणुक लढवणार नाही इतपत ठीक होते. मात्र पालिकेत जो पक्ष सत्तेत सहभागी नसतो व दुसऱ्या क्रमांकाचे सदस्य असणार पक्ष असतो अश्या पक्षाला विरोधी पक्ष नेते पद दिले जाते. दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाने विरोधी पक्ष नेते पद घेण्यास नकार दिल्यास इतर कोणत्याही पक्षाला विरोधी पक्ष नेते पद देण्याचा नियम पालिकेच्या नियमात नसल्याने महापालिकेत विरोधी पक्ष नेते पद कोणाला द्यावे ? यावरून कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. या पेचावर तोडगा काढण्यासाठी महापौर निवडी नंतर नवे महापौर आणि गटनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.दरम्यान भाजपाने विरोधी पक्ष नेते पदावर दावा करणार नाही असे म्हटले असले तरी अद्याप तसे पालिका चिटणीस विभागाला लेखी पत्र दिलेले नाही. भाजपाने असे पत्र दिल्यास त्यावर कायदेशीर सल्ला घेतला जाईल. कायद्यामध्ये दुसऱ्या क्रमांका व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाला हे पद देता येत नसल्याने हा पेच सुटत नाही तो पर्यंत मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते पद हे रिक्त राहणार आहे.

चौकट
महापौर निवडणुकीसाठी पालिका सज्ज
=========================
महापौर निवडणुकीसाठी पालिका सज्ज झाली आहे. 8 मार्चला जुन्या नगरसेवकांचा कालावधीचा संपत आहे. मात्र या दिवशी जुन्या नगरसेवकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. नव्या निवडून आलेल्या नगरसेवकानी कोंकण आयुक्त यांच्याकड़े नोंदणी केलेल्या पावतीवर मुख्यालयात व सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे. नव्या नगरसेवकांना गेट नंबर 6 मधूनच प्रवेश दिला जाईल. महापौरांची निवडणुक झाल्या नंतर त्वरित नविन गट नेत्यांची, 4 वैधानिक समित्याच्या सदस्यांची घोषणा केली जाणार आहे. 14 मार्चला स्थायी व शिक्षण समितीची तर 16 मार्चला बेस्ट सुधार व समितीची निवडणुक होणार आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget