मुंबईतील मराठी माणसानी आपल्या मनगटातील ताकद दाखवून दिली- उध्दव ठाकरे

मुंबई, बुधवार (प्रतिनिधी)- सोन्याची अंडी देणा-या आणि सर्वाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकला असून मराठी माणसाच्या मनगटात किती जोर आहे, त्यांनी दाखवून दिले आहे. याबद्दल मी शिवसैनिकांचा आभारी असून शिवसेनेवरील ही निष्ठा, शिवसेनेची ताकद अशी कायम ठेवा, असे भावूक आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदी शिवसेनेच्या उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ते पालिका मुख्यालयात आले होते. यावेळी ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. यांनतर शिवसेनेने महापालिका ते हुतात्मा स्मारकादरम्यान शक्तिप्रदर्शन करून हुतात्मा स्मारकास अभिवादन केले.
मुंबईवर सलग पाचव्यांदा भगवा फडकला आहे. याबाबत मुंबईकरांचे आभार मानण्यास माझ्याजवळ शब्द नाहीत. मुंबईकरांनी जो विश्वास दाखवला आहे, त्यासाठी अविरत सेवा करण्यास मी सदैव तत्पर आहे. मुंबईत काही जागा कमी पडल्या त्याची नक्कीच भरपाई करू, असे ठाकरेंनी स्पष्ट केले. शिवाय ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला मदत केली, त्या सर्वांचे आभार. मुंबई व ठाण्याचा आनंद अनुभवू द्या. कारण आनंदापेक्षा विजय महत्वाचा असतो, असे त्यांनी सांगितले. दरम्यान प्रसारमाध्यांनी भाजपने केलेल्या घोषणांबाबत ठाकरे यांना छेडले असता, कोण काय घोषणा करेल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, मला त्यावेळेस शिवाजी महाराज की जय हीच घोषणा अपेक्षित होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी स्मारकासाठी कोणापुढे हात पसरणार नाही. भंपकपणा विरोधाती लढाई आमची यापुढे सुरु राहील. शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावर जे मुद्दे आहेत ते यापुढेही राहतील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget