पालिका बहुमतासाठी भाजपची गवळींना 'गळ'

मुंबई, गुरुवार (प्रतिनिधी)- मुंबई पालिका महापौरपदासाठी बहुमत मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात चढाओढ सुरू आहे.या फोडाफोडींच्या राजकारणावर सेना- भाजपने भर दिला असून अभासेच्या गिता गवळी यांना गळाला लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गवळींची शिवसेनेबरोबरची बोलणी फिस्कताच त्यांना भाजपने आमंत्रण दिले आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा कोणाला या चर्चेला उधाण आले आहे.
मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक ८ मार्चला होत आहे. शिवसेना आणि अपक्ष मिळून ८८ मताधिक्य आहे. तर भाजपकडे ८२ मताधिक्य असल्याने भाजपने फोडाफोडीवर भर दिला आहे. यामुळे शिवसेना व भाजपमध्ये चुरस लागली आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये हालचाली सुरु आहेत. पालिकेत एकूण ५ अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी ४ अपक्षांना शिवसेनेने गळाला लावत ८८ संख्याबळ असलेली नोंदणी कोकण आयुक्तांकडे केली. त्यानंतरही अखिल भारतीय सेनेच्या एकमेव नगरसेविका गीता गवळी या मागीलप्रमाणेच शिवसेनेला पाठिंबा देतील अशी शक्यता होती. मात्र त्यांनी सेना भवनात जाऊन आरोग्य समिती अध्यक्ष पद आणि पाच वर्ष स्थायी समितीच्या सदस्य पदाचा प्रस्ताव पुढे केला. हा प्रस्ताव शिवसेना मान्य करणार असल्याचे समजताच गवळी यांनी चर्चा अर्धवट सोडून भाजपडे मोर्चा वळवला, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्री त्यांच्या मागण्या पूर्ण करतील का, की केवळ बहुमतासाठी गळ घालतील असा पेच गवळीपुढे आहे. शिवसेनेसोबत चर्चा झाली. भाजपसोबत चर्चा होणार आहे. मात्र, अजून तरी मी कोणालाही पाठिंबा दर्शवलेला नाही. शुक्रवारी याबाबतचा खुलासा करेन, असे अभासेच्या गिता गवळी यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget