मुंबई, गुरुवार (प्रतिनिधी)- समसमान मत मिळाल्यानंतर ईश्वर चिठ्ठीतून अतुल शहांना विजयी घोषित केल्यामुळे वॉर्ड क्रमांक २२० चे शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र बागलकर यांनी लघुवाद न्यायालयात धाव घेतली. यासंदर्भात २० मार्च रोजी सुनावणी होणार असून यावर बागलकर यांचे भवितव्य अवलंबून आहे.
मुंबई महापालिकेच्या २३ फेब्रुवारीला निवडणुकीकरिता मतदान झाले. यात बागलकर व शाह यांना ५९४६ अशी समसमान मते मिळाली. दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने फेरमतमोजणी घेण्यात आली. मात्र यावेळीही समान मते मिळाल्याने संबधित अधिकाऱ्यांंनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना बोलावून चिठ्ठी उडवून निकाल काढला. यामध्ये शाह यांंना विजयी घोषीत करण्यात आले. यामुळे पाच टेंडर व्होटींगची मते पुन्हा मोजण्यात यावीत, अशी मागणी करणारी याचिका बागलकर यांनी लघुवाद न्यायालयात दाखल केली आहे. यामुळे न्यायालयाकडून कोणता निर्णय मिळणार,याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Post a Comment