मुंबई रविवार ( प्रतिनिधी ) – लोकांना घर आणि ऑफिस बनवण्यास बिना व्याजाचे कर्ज देणाऱ्या तसेच स्थानिक कामगारांना काम देणाऱ्या 'आई री कंस्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड' कंपनीच्या च्या कार्यालयाचे उदघाटन फिल्म अभिनेत्री रविना टंडनने नुकतेच केले. यावेळी रविनाने आई री कंस्ट्रक्शनचे ब्रँड अँबेसेटर बनण्यास सहमती दर्शवली आहे. नायगांव पूर्व येथे आयोजित एका कार्यक्रमात अभिनेत्री रवीना टंडनने या कंपनीचे ब्रँड अँबेसेटर बनल्याने आपण खुश झाल्याचे सांगितले. २०१५ में स्थापना झालेल्या आई री कंस्ट्रक्शनमध्ये शेकडो लोक काम करत आहेत. यावेळी कंपनीच्या एका जागेवरून एकाचवेळी १२ राज्यात ४५ शाखांचे उदघाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमात कंपनीचे संस्थापक अध्यक्ष ए.डी. ओझा, प्रबंध निदेशक योगिता स्वप्निल कुऱ्हाडे, बिपीन गुप्ता, सुरेश पोल, प्रशांत भोईर , अनुपम राय, छाया भोईर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान हि कंपनी लोकांना घर आणि ऑफिस बनवण्यास बिना व्याजाचे कर्ज देणार असून स्थानिक कामगारांना कामही देणार आहे.
Post a Comment