मुंबई, शनिवार (प्रतिनिधी)- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लोकसंख्ये बरोबर वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे या वाहनांच्या वाढती संख्या आणि वाहनतळांच्या अभावामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. या दिव्य संकटातून मार्ग काढण्यासाठी पालिकेने सुमारे ३०० ठिकाणी वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला. ३० एप्रिल २०१७ पर्यंत प्राथमिक कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेश पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मासिक आढावा बैठकीत हा निर्णय झाला असून यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, आय. ए. कुंदन, संजय देशमुख यांच्यासह पालिकेचे सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख उपस्थित होते.
शहराच्या मध्यवर्ती तसेच रहदारी असणाऱ्या भागांत महापालिकेने वाहनतळ निश्चित केली आहेत. परंतु, काहीं जागांवर खासगी संस्था, आस्थापनांनी कब्जा मिळवला आहे. तर सर्रास रस्त्याच्याकडेला आणि मोकळ्या जागांवर वाहने उभी केली जातात. मुंबईत वाढत्या वाहतूक कोंडी समस्या डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे वाहनतळ असून ही नसल्यासारखी असल्याने पालिका त्यावर ठोस उपाययोजना करणार आहे. शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांवर ९२ आणि रस्त्याव्यतिरिक्त २९ ठिकाणी वाहनतळे आहेत. ही वाहनतळे अपूरी पडू लागल्याने रस्त्यांवरील वाहनतळांची संख्या ९२ वरून ३०० पर्यंत वाढविण्यात येणार आहेत. याबाबतची प्राथमिक कार्यवाही येत्या ३० एप्रिल २०१७ पर्यंत पुर्ण करावी, असे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी रस्ते व वाहतूक अभियंत्यासह सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. तसेच कोणत्या भागात वाहनतळांची गरज आहे, याची चाचपणी करुन वाहनतळांसाठीच्या सुयोग्य जागा निश्चित कराव्यात व त्याबाबतची माहिती तातडीने रस्ते व वाहतूक मुख्य अभियंत्यांना द्याव्यात, असे निर्देश आयुक्तांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
परावर्तकासह खेदफलक लावा दुरध्वनी, भ्रमणध्वनी, घरगुती वापराच्या गॅस वाहिन्या, विद्यूत वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदले जातात. विविध अटी व शर्तींनुसार पालिका या खोदकामासाठी परवानगी देते. अनेकदा या नियमांचे पालन होताना दिसत नाही. परिणामी दुर्घटना घडण्याचे प्रकार होतात. त्यामुळे जिथे काम चालू असेल तेथे फलक लावून त्यावर संबंधित उपयोगिता देणाऱ्या संस्थेचे नाव, संस्थेच्या समन्वय अधिकाऱ्यांच्या नावासह भ्रमणध्वनी क्रमांक, काम सुरू केल्याची व ते पूर्ण होण्याची तारीख इत्यादी तपशील ठळकपणे नमुद करणे बंधनकारक केले आहे. तसेच ज्या ठिकाणी काम सुरु असेल तेथे संरक्षण कठडे उभारणे, व पादचारी व वाहनचालकांच्या दृष्टीने परावर्तकासह कठड्यांवर खेदफलक बसवावे, अशी अट पालिकेने घातली आहे. या अटीचे पालन केल्यास सर्व ठिकाणची कामे तातडीने बंद करण्यात येणार आहेत.
बायोमेट्रीक यंत्रणा लावणार पालिकेत १ लाखापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी नोंदविण्यासाठी पालिका बायोमेट्रीक यंत्रणा बसवणार आहे. १ एप्रिल २०१७ पासून ही यंत्रणा पालिकेच्या २४ प्रशासकीय कार्यालयात लावली जाईल. आधार क्रमांक आणि हाताचे बोट यंत्रावर ठेवून हजेरीची नोंद होणार आहे. सध्या यंत्रे प्रायोगिक तत्वावर लावली जाणार असून साधारणपणे ३० हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नोंद संबंधित सॉफ्टवेअरमध्ये जतन करण्यात आले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांची माहिती संगणकावर अद्यवत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

Post a Comment