अल्पशिक्षित, अंगटे बहाद्दरही पालिका निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या उमेदवारांमध्ये अल्पशिक्षित व अंगटे बहाद्दरांची संख्या मोठी असल्याचे समोर आले आहे. उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे जाहीर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात अल्पशिक्षित व अल्पशिक्षितांची संख्या मोठी आहे. यांमध्ये काही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे. 

पालिकेच्या 21 फेब्रुवारीला 227 जागांसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 2272 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी असून यांत सर्वाधिक अशिक्षित उमेदवार आहेत. तर उच्चशिक्षित उमेदवारांना संधी देणार असे जाहिरपणे सांगणा-या काही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्येही बहुतांशी अल्पशिक्षित उमेदवारांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. यांमध्ये काही लक्षणीय लढतींमध्येही समावेश असल्याचे दिसते आहे. पाचवी ते नववी असे शिक्षण असणा-यांची संख्या मोठी आहे. अपक्षांमध्ये शाळेची कधीही पायरी न चढलेले अंगटे बहाद्दर उमेदवार मोठ्या प्रमाणात आहेत. तर रिंगणात असणा-या एकूण उमेदवारांमध्ये पदवी व उच्चशिक्षित उमेदवारांची संख्य़ा अत्यल्प आहे. अनेक अपक्ष उमेदवारांनी कोणतीही सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी नसताना उमेदवारी दाखल केली आहे. काही शिक्षित अपक्षही या निवडणुकीत प्रस्थापित अल्पशिक्षितांशी लढा देत आहेत.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget