मुंबईचे डब्बेवाला करणार मतदान जनजागृती

गुरवार ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या वतीने ऑगस्ट – २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या मतदार जनजागृतीबाबत खुली चित्रकला, घोषवाक्ये स्पर्धेतील निवडक चित्रे व घोषवाक्यांचे प्रदर्शन शनिवार, १८ व रविवार, १९ फेब्रुवारी, रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळील भाटीया उद्यानाशेजारील सुलभ शौचालयाजवळ व चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर (फलाट क्रमांक ४) मोकळ्या जागेत भरविण्यात येणार आहे.

मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱया व सातासमुद्रापलीकडे भागवत पताका फडकविणारे मुंबईचे डब्बेवाले भव्य मतदार जागृती दिंडी उद्या, शुक्रवार, १७ रोजी काढण्यात येणार आहे. सदर जनजागृती चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेरील प्रदर्शन मंडपापासून सायंकाळी ६ वाजता निघणार आहे. या दिंडीत जवळपास ५०० डब्बेवाले व पारंपरिक वेशात वासुदेव सहभागी होणार आहेत. १७ फेब्रुवारी,रोजी चर्चगेट – हुतात्मा चौक – पालिका मुख्यालय (सीएसटी) – हुतात्मा चौक – रिगल सिनेमा – मंत्रालय, नरिमन पॉईंट – चर्चगेट असा दिंडीचा मार्ग असणार आहे. तर शनिवार, १८ फेब्रुवारी, रोजी सायंकाळी ६ वाजता अंधेरी (पश्चिम) येथील सात बंगला येथून दिंडी निघणार आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget