मतदान प्रक्रियेसाठी बृहन्मुंबई महापालिका सुसज्ज !मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – २१ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकसाठी मतदान होणार आहे. सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या कालावधीदरम्यान होणा-या या मतदान प्रक्रियेदरम्यान मुंबईकर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा व लोकशाही प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केले आहे. या मतदान प्रक्रियेसाठी पालिका सुसज्ज असून पालिकेच्या २२७ प्रभागांमध्ये ७ हजार ३०४ मतदान केंद्रे मुंबईकर मतदारांच्या सोयीसाठी तयार करण्यात आली आहेत, असेही मेहता यांनी सांगीतले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या ५ जानेवारी च्या मतदार यादीमध्ये ज्यांची नावे असतील त्यांनाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ही संपूर्ण मतदार यादी ही पालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचबरोबर https://localbodyvoterlist.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदाराच्या नावाच्या आधारे मतदान केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे.याशिवाय मतदारांनी कुठे व कोणत्या मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी जावे? ही माहिती शोधणे सुलभ होण्याच्या दृष्टीने 'True Voter' हे ऍन्ड्राईड ऍप देखील राज्य निवडणूक आयोगाद्वारे तयार करण्यात आले आहे. तसेच एका खाजगी संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आलेले 'https://operationblackdot.in' हे संकेतस्थळ देखील मतदारांच्या सुविधेसाठी उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर देखील मतदाराच्या नावाच्या आधारे मतदान केंद्र शोधण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन दिली आहे

Post a Comment