पालिका प्रचाराच्या तोफा थंडावल्या - रात्रीपासून छुपा प्रचार

मुंबई रविवार ( प्रतिनिधी ) –पालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांच्या सुरू असलेल्या प्रचारांच्या रणधुमाळी तोफा रविवारी साडेपाचनंतर थंडावल्या. मात्र त्यानंतर उमेदवारांचा छुपा प्रचार सुरू झाला आहे. रविवारी रात्रीपासूनच मतदारांच्या गाठीभेटी, कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.
पालिकेची निवडणूक मंगळवारी होत आहे. या निवडणुकीसाठी 2275 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांनी यावेळी युती किंवा आघाडी केलेली नाही. त्यामुळे चौरंगी लढती होणार आहेत. मागील महिनाभर सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला. प्रचाराचा शेवटच्या टप्प्पातील शनिवार सर्वच पक्षांच्या प्रचार सभांनी गाजला. रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवशी सकाळपासूनच रॅली, चौकसभा घेऊन सायंकाळी साडेपाच वाजता सर्वच पक्षांनी आपला प्रचार थांबवला. रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवशी वसाहती, गल्ल्या, चौक, नाके अवघा परिसर दणाणून गेला. सुट्टीचा दिवस असल्याने सकाळी आठ वाजल्यापासूनच पक्षाच्या निवडणूक कार्यालयासमोर कार्यकर्ते प्रचारासाठी सज्ज होते. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रचार संपवणे बंधनकारक असल्याने सर्वच पक्षांनी त्याची काळजी घेतली होती. मुंबईतल्या बहुतांशी वसाहतींचा परिसर निवडणुकीमय झालेला दिसत होता. लालबाग -परळ, काळाचौकी, दादर, माटुंगा आदी ठिकाणी बाईक रॅली काढून प्रचार करण्यात आला. प्रचारात तरूणाईही मोठ्या प्रमाणात उतरली होती. विविध पक्षांच्या प्रचारगीतांनी प्रचारात रंगत आणली. महिनाभर राजकीय पक्षांच्या धडाडणा-या तोफा अखेर संध्याकाळी थंडावल्या. महापालिकेकडून मतदारांना मतदान ओळखपत्र (चिट्टी) वाटप करण्याचे कामही रविवारी सुरू होते. आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर याची माहिती उपलब्ध करून दिली आहे. सोशल मीडियावर ही माहिती अनेकांपर्यंत पोहचल्याने आपले नाव यादीत आहे की नाही, याची माहितीही अनेकांनी घेतली. मतदानाच्या पूर्वसंध्येला चाळी, इमारती, झोपडपट्ट्यांमध्ये साड्या, धान्य, पैसे आणि भेटवस्तूंचे वाटप मोठ्या प्रमाणात होते. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने १३ स्टॅटिक पथके, ९८ भरारी पथके, ३९ व्हिडीओ सर्व्हेलियन्स पथके तैनात केली आहेत. तसेच पालिका, पोलिस, आयकर, विक्रीकर, पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग यांचीही नजर असणार आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget