औरंगाबाद : 'जॉली एलएलबी-२' चित्रपट प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी झाली असता या प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने याचिकेच्या पुढील सुनावणीच्या वेळी अहवाल सादर करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे व न्या. एस. एस. पाटील यांनी याचिकेची पुढील सुनावणी ३ फेब्रुवारी रोजी ठेवण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी नांदेड येथील वकील अजयकुमार वाघमारे यांनी 'जॉली एलएलबी-२' या चित्रपटात वकील, न्याय व्यवस्था, वकिली पेशा यांचे बीभत्स चित्रीकरण करण्यात आल्याबद्दल आक्षेप घेत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या यचिकेची शुक्रवार, २0 जानेवारी रोजी सुनावणी झाली असता हा चित्रपट १0 फेब्रुवारी २0१७ रोजी १0 देशात आणि ४00 चित्रपटांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळी याचिकाक र्त्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, या चित्रपटाचे ट्रेलर नं. १ रिलीज करण्यात आले आहे. या ट्रेलरमध्ये प्रदर्शित दृश्ये पाहून सकृतदर्शनी न्यायालयायची बेअदबी, भारतीय न्याय व्यवस्थेचे बीभत्स चित्रण व वकिली व्यवसायाला काळिमा फासणारे डायलॉग आहेत. यावर चित्रपटाच्या निर्मात्याने ३0 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी चित्रपटाचे ट्रेलर-२ व सीडी, फोटो न्यायालयात दाखल केले. त्यातही न्यायदान व्यवस्था, वकिली व्यवसायाचे बीभत्स चित्रीकरण करण्यात आले आहे. याचिकाक र्त्याने सुनावणीच्या वेळी चित्रपटातील बीभत्स दृश्ये वगळावीत, चित्रपटाच्या नावातून 'एलएलबी' शब्दावर आक्षेप घेऊन ते वगळल्यानंतरच चित्रपट प्रदर्शित करण्याची न्यायालयाला विनंती केली. यावर चित्रपटाच्या निर्मात्याने न्यायालयात शपथपत्र दाखल केले. चित्रपटाची सीडीसह निर्मात्याने पुन्हा अतिरिक्त शपथपत्र न्यायालयात दाखल केले. आता पुढील सुनावणी ३ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.
Post a Comment