मुंबई रविवार ( प्रतिनिधी ) – मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून तीन दिवसांत 14 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 27 जानेवारीला पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. दुसऱ्या दिवशी शनिवारी 5 व तिसऱ्या दिवशी रविवारी 9 अर्ज दाखल झाले.
मुंबई महापालिकेची 227 जागांसाठी येत्या 21 फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. यासाठी 27 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी दाखल झालेल्या 9 अर्जापैकी पश्चिम उपनगरातील वॉर्ड क्रमांक 12 मधून 1, 79 मधून 1, 81 मधून 1, असे 4 उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. तर पूर्व उपनगरातून वॉर्ड क्रमांक 106 मध्ये 1, 133 मधून 2 असे तीन तर शहरामध्ये वॉर्ड क्रमांक 176 मधून 1, 179 मध्ये 1, एकूण 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. अर्ज भरण्याची मुदत 3 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे.
Post a Comment