भाजपाच्‍या उमेदवारी निवडीची प्रक्रिया पारदर्शी पध्‍दतीने

मुंबई रविवार ( प्रतिनिधी ) – मुंबई भाजपाच्‍या उमेदवारी यादीला अंतिम स्‍वरूप देण्‍यासाठी आणि भाजपाची मुंबईतील रणनिती ठरविण्‍यासाठी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या उपस्थितीत आणि मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवास्‍थांनी मुंबईतील खासदार, आमदार आणि पदाधिकार्यांची बैठक झाली. या निमित्‍ताने उमेदवार निवडीची प्रक्रियाही पारदर्शी पध्‍दतीने सुरू झाली असून आज तीन जिल्‍हयातील सुमारे 120 उमेदवारांची यादी अंतिम करण्‍यात आली तर उर्वरीत उद्या होणार आहे.

भाजपाची निवडणुक तयारी जोरदार सुरू असून या संपुर्ण प्रक्रियेवर स्‍वतः मुख्‍यमंत्री लक्ष ठेवून आहेत. मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली मागिल आठवडयात झालेल्‍या निवडणुक समितीच्‍या मॅरथॉन बैठकीत 527 जणांच्‍या नावाची यादी तयार करण्‍यात आली होती. त्‍याला आता अंतिम स्‍वरूप देण्‍यात येत आहे. आज मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या उपस्थितीत आणि आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पुन्‍हा मुंबईतील सर्व भाजपा खासदार, आमदार आणि जिल्‍हा अध्‍यक्षांची बैठक वर्षा निवास्‍थानी घेण्‍यात आली. या बैठकीत प्रचाराची रणनिती, सभा व प्रचार याबाबात चर्चा करण्‍यात आली. लवकरच भाजपाची यादी आणि जाहीरनामा प्रकाशित करण्‍यात येणार असल्‍याची माहिती प्रवक्‍ते अतुल शाह यांनी दिली.या बैठकीला मंत्री विनोद तावडे, प्रकाश महेता, राज्‍यमंत्री विद्या ठाकूर ,खासदार किरिट सोमय्या, पुनम महाजन, गोपाळ शेट्टी, आमदार राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, भाई गिरकर, मनिषा चौधरी, पराग अळवणी, प्रविण देरेकर, राम कदम, अमित साटम, योगश सागर, अतुल भातकळकर, कॅप्‍टन तमिल सेलवन, आर. एन. सिंह, भारती लव्‍हेकर आदींसह संघटनमंत्री सुनिल कर्जतकर, गटनेते मनोज कोटक, आणि सहाही जिल्‍हा अध्‍यक्ष उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget