एल’ विभाग अंतर्गत येणाऱया मार्गावरील लाल बहादूर शास्त्री मार्ग व सी.एस.टी. रोड येथे अतिक्रमण निर्मुलनाची धडक कारवाई

मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या ‘एल’ विभागांतर्गत येणाऱया लाल बहादूर शास्त्री मार्ग व सी. एस. टी. मार्गावरील अतिक्रमणे उप आयुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली व ‘एल’ विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने हटविण्यात आली.
लाल बहादूर शास्त्री मार्ग व सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्त्याच्या जंक्शनपर्यंतची पदपथ व रस्ते यांवरील आच्छादने व ओटले अशा एकूण ७५ ठिकाणी आणि सी. एस. टी. मार्ग येथे एकूण ४५ ठिकाणी तर सी. एस. टी. सिग्नल ते एन. एस. एस. मार्ग व लाल बहादूर शास्त्री मार्ग जंक्शनपर्यंत एकूण १३ ठिकाणी पदपथ व रस्ते यांवरील आच्छादने व ओटले अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई केली सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण निर्मुलन) अंतर्गतचे वाहतूक पर्यवेक्षक, जे.सी.बी., टेम्पो, टोईंग व्हॅन, अभियंता, कामगार, वरिष्ठ निरिक्षक (अतिक्रमण निर्मुलन), लॉरी निरिक्षक (अतिक्रमण निर्मुलन) यांच्या सहाय्याने अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई करण्यात आली.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget