पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची आज अंतिम लोकनृत्य स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ

मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – बालकोत्सव – २०१६-१७ निमित्त पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची अंतिम लोकनृत्य स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या शुभहस्ते उद्या बुधवार रोजी सकाळी ११ वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, कै. नटवर्य दत्ता भट मार्ग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभास अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, उप आयुक्त (शिक्षण) मिलीन सावंत यांना प्रमुख अतिथी म्हणून तर विशेष उपस्थितीत प्रख्यात अभिनेत्री सुहास परांजपे, प्रख्यात सिने हास्य कलाकार अरुण कदम व सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक देवेंद्र पेम यांना निमंत्रित करण्यात आले आहे समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी केले आहे.‘बालकोत्सव – २०१६-१७’ विषयीः बालकोत्सव अंतर्गत पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांचे प्रदर्शन व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यास संधी प्राप्त होत असते. पालिकेच्या शिक्षण विभागात सुमारे १ हजार १४८ विविध भाषिक शाळा व विशेष मुलांच्या १७ शाळा आहेत. पालिकेच्या विविध भाषिक शाळांमध्ये २ लाख ९४ हजार ९६५ विद्यार्थी व विशेष मुलांच्या शाळांमध्ये ८६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध भाषिक शाळांतील विद्यार्थी आपली जात, भाषा, संस्कृती विसरुन सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनृत्य व नाटय़ या विविध क्षेत्रात आपल्या कलागुणांचा अविष्कार करण्यासाठी बालकोत्सव उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. बालकोत्सव हा शिक्षण विभागातील एक विशेष उपक्रम असून त्या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे हा आहे या उपक्रमाद्वारे अधिकाधिक विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget