मुंबई : एकीकडे शिवसेना-भाजपा युतीसाठी चर्चेचे गुर्हाळ सुरू असताना दुसरीकडे भाजपासोबत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाच्या उमेदवारांनी पालिका निवडणुकीत भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढायची नाही अशी भूमिका घेतली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी रिपाइं उमेदवारांना भाजपाचे निवडणूक चिन्ह देण्याचे प्रकार घडले. त्यामुळे या वेळी सावध झालेल्या रिपाइं (ए) ने असे प्रकार पुन्हा घडू नयेत, असे विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे-पाटील यांना दिले असल्याची माहिती रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर आणि राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. रिपाइं भाजपा सोबत युतीमध्ये असला तरी स्वतंत्र अस्तित्व असणारा पक्ष आहे. रिपाइंलाही पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी रिपाइं उमेदवारांना भाजपाचे निवडणूक चिन्ह देण्याचे प्रकार घडले. त्यामुळे या वेळी सावध होत पालिका निवडणुकीत भाजपाचे चिन्ह न घेता निवडणूक लढवण्याचे उमेदवारांनी ठरवले आहे. तसेच रिपाइं उमेदवारांसमोर भाजपाचे बंडखोर उमेदवार उभे राहू नयेत, बंडखोरांना भाजपाने निवडणूक चिन्ह आणि ए-बी फॉर्म देऊ नये, असेही या पत्रात नमूद करण्यात आले असल्याचेही पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या वेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणो, तानसेन ननावरे, काकासाहेब खंबाळकर, डी. एम. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment