मुंबई: किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे पुलाखाली अडकलेला कंटनेर जवळपास 6 तासांनी हटवण्यात आला आहे. त्यामुळे रखडलेली वाहतूक हळूहळू सुरळीत होत आहे.
आज पहाटे 5 च्या सुमारास किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे पुलाखाली भलामोठा कंटेनर अडकला. अवजड वाहनांना या रस्त्यावरुन परवानगी नाही. उंचीची मर्यादा असूनही चालकाने कंटेनर तसाच पुढे नेल्याने, तो ब्रिजमध्ये अडकला. त्यामुळे या मार्गावर सकाळी सकाळी रस्ते वाहतुकीचा खोळंबा झाला. परिणामी पहाटेपासून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या.
Post a Comment