यंदा राज्यभरातील बहुतांश भागांत फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवडय़ापासूनच काहिली सुरू झालीय. मार्च महिन्यापासून उकाडा आणखी वाढणार असल्याचं भाकित केंद्रीय हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात आलंय त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये लोकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागणार आहे.
हवामान विभागाचा २०१६ मध्ये उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ होईल, हा अंदाज बरोबर ठरला होता. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी उष्णतेच्या लाटांची संख्या सरासरीएवढी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. यावेळी किनारपट्टी वगळता राज्याच्या अंतर्गत भागात उष्णतेच्या लाटांची तीव्रता सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशी शक्यता वर्तवण्यात आलीये. येत्या तीन महिन्यात राज्यातील तापमानात नेहमीच्या उन्हाळ्यापेक्षा १ अंश सेल्सिअसनं वाढ होणार असून विदर्भातील कमाल तापमानात एक अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ होण्याचा अंदाज केंद्रीय हवामान विभागाने व्यक्त केलाय.
राज्यात कोकण वगळता इतरत्र म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे उष्णतेच्या लाटा येतील. सलग दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस सरासरी तापमानात पाच अंश से. पेक्षा जास्त वाढ झाली तर उष्णतेची लाट असल्याचे जाहीर केले जाते अशी माहिती नागपूपर हवामान विभागाचे संचालक ए डी ताठे यांनी दिली.
Post a Comment