३१ ऑक्टो. २०१६ पर्यंत तात्पुरते शेड्स न काढणा-यांना यंदा परवानगी नाही


तात्पुरते पावसाळी शेड्स ३१ ऑक्टोबर पूर्वी काढणे बंधनकारक
मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – गेल्यावर्षी पावसाळ्याच्या काळात उभारलेले तात्पुरते शेड्स ज्यांनी हमी देऊनही ३१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत काढून टाकले नाही, त्यांना या वर्षी तात्पुरते शेड उभारणीसाठी परवनागी देऊ नये, असा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या संबंधीच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मंजुरी दिली आहे.

दरवर्षी पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक हॉटेल्स, दुकाने, कार्यालये, घरे अशा विविध आस्थापना तात्पुरत्या शेड्स उभ्या करीत असतात. त्यासाठी पालिकेच्या संबंधित विभागीय कार्यालयांकडून रीतसर परवानगी दिली जाते. ही परवानगी देताना संबंधितांनी हे शेड्स पावसाळा संपल्यानंतर ३१ ऑक्टोबर पर्यंत काढून टाकणे बंधनकारक असते. तरीही काही ठिकाणी या शेड्स तशाच उभ्या असतात ३१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत या तात्पुरत्या पावसाळी शेड्स काढून न टाकणा-या आस्थापनांवर कारवाई करण्यासोबतच या वर्षापासून त्यांना तात्पुरत्या शेड्ससाठी परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. विभाग कार्यालयातील संबंधित सहाय्यक अभियंता (इमारते व कारखाने) यांनी यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेऊन त्यात ज्यांना परवानग्या देण्यात आल्या त्यांची नावे आणि इतर तपशील याची नोंद ठेवण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत. विभागीय कार्यालयाच्या इमारत व कारखाने खात्यातील संबंधित 'बीट अधिकारी' यांनी त्यांच्या भागातील तात्पुरत्या पावसाळी शेड्ससाठी परवानगी दिलेल्या आस्थापनांनी ३१ ऑक्टोबर पर्यंत शेड्स काढली आहेत किंवा नाहीत याची पाहणी करावी. तसेच ज्या आस्थापनांनी ३१ ऑक्टोबर पर्यंत शेड्स काढली नसतील त्यांची नावे नोंदवहीमध्ये नोंदवावीत. ज्या आधारे पुढील वर्षी या आस्थापनांना परवानगी नाकारता येऊ शकेल. शिवाय संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी पावसाळा संपल्यानंतर हे तात्पुरते शेड्स काढले जातात किंवा नाही याचा आढावा घेऊन नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget