मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नालेसफाई चांगली झाल्याचा दावा मुंबई पालिकेकडून केला जात असतानाच प्रशासनाचा हा दावा मान्सून पूर्व पावसात पुन्हा एकदा फोल ठरला आहे मुंबईत १२ जून रोजी पडलेल्या पावसात तब्बल ४१ ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत 8 जुन रोजी पडलेल्या पावसामुळे तब्बल 14 ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या त्यामुळे पालिकेचे कोटयावधी रुपये पाण्यात गेले
मुंबईत १२ जून सकाळी ८.३० ते १३ जून सकाळी ८.३० या २४ तासात कुलाबा येथे २४.६ मिलीमीटर तर कुलाबा येथे २.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. १२ जून रोजी दुपारी दिड ते दोन या अर्धा तासात पडलेल्या मुसळधार पावसात शहर विभागात १४, पूर्व विभागात ६ तर पश्चिम उपनगरात २१ अश्या एकूण ४१ ठिकाणी पाणी तुंबण्याच्या तक्रारी पालिकेकेकडे नोंद झाल्या आहेत. मुंबईमधील शहर विभागात हिंदमाता, सायन, किंग सर्कल, माटुंगा, दादर, वरळी, शिवाजी पार्क, अँटॉप हिल, परेल, धारावी, वडाळा, पूर्व उपनगरात गोवंडी, चेंबूर, देवनार कॉलनी तर पश्चिम उपनगरात मालाड, गोरेगांव, अंधेरी, विलेपार्ले, बोरिवली, कांदिवली, बांद्रा, सांताक्रूझ या ठिकाणी पाणी तुंबण्याच्या तक्रारी नागरिकांकडून पालिकेला करण्यात आल्या. या तक्रारी संबंधित विभागाला कालवून पंपाद्वारे तसेच पर्जन्य जलवाहिन्याच्या जाळ्या साफ करून पाण्याचा निचरा करण्यात आल्याचे पालिकेला कळविले आहे १२ जूनच्या पावसात पूर्व उपनगरात २ पश्चिम उपनगरात २ अश्या ४ ठिकाणी घराचा भाग व भिंती पडण्याच्या तक्रारी पालिकेकडे नोंद झाल्या असून घटनास्थळी मदतकार्य उपलब्ध करून देण्यात आल्याचे पालिकेने कळविले आहे. शॉर्टसर्किटच्या १० घटना नोंद झाल्या असून त्यापैकी शहरात ६ व पश्चिम उपनगरात ४ तक्रारींची नोंद झाली आहे. झाडे व झाडाच्या फांद्या पडण्याच्या ९६ तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या असून त्यात शहरात २७, पूर्व उपनगरात ९ तर पश्चिम उपनगरात ६० तक्रारींचा समावेश आहे. कुलाबा वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शार व उपनगरात पुढील २४ तासात गडगडाटासह पावसाच्या सारी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१३ जून सकाळी ६ वाजता पावसाची नोंद
तलाव पाऊस मिलीमीटर पाण्याचा साठा
मोडक सागर ३४ २२१३३
तानसा १०३.२० ३३१३१
विहार २८.४० ६४३८
तुलसी १६.८० २४३७
अप्पर वैतरणा ११ ०
भातसा ४९ १०३४७३
मध्य वैतरणा ७३ १०५८५४
एकूण २०१७ २७३४६६
२०१६ १२४४९३
Post a Comment