भायखळा विभागात 13 हजार 400 किलो बर्फ जप्त

बर्फ व पाणी नमुन्यात ई -कोलाय जीवाणू
मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेच्या ई विभागात सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे 13 हजार 400 बर्फ जप्त करण्यात आला. 1 जून ते 7 जून पर्यंत ही कारवाई करण्यात आली. याविभागातील चापसी भिमजी मार्ग, पेनीन्सुला पार्क, राणीबाग, ताडवाडी येथील फेरीवाल्यांकडून बर्फ व पाणी नमुन्यात ई कोलाय जीवाणू आढळून आल्याने या ठिकाणचा बर्फ जप्त करून नष्ट करण्यात आला.
दीड महिन्यांपूर्वी पालिकेने धडक मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे. मध्यंतरी काही दिवस ही मोहिम थंडावल्याची स्थिती होती. आता महापालिकेने ही मोहिम पुन्हा तीव्र केली आहे. ई विभागात 1जून ते 7 जून पर्यंत आठवडाभर ही मोहिम सलग राबवण्यात आली. 1 जूनला 2 हजार 100 किलो, 2 जून 1 हजार 900 किलो, 3 जूनला 2 हजार 600 किलो, 5 जूनला 3 हजार 100 किलो व 7 जून रोजी 1 हजार 400 किलो असा एकूण 13 हजार 400 किलो बर्फ जप्त करून नष्ट करण्यात आल्य़ाची माहिती पालिका उपआयुक्त सुहास करवंदे यांनी दिली.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget