पालिकेने सुरु केली 'ऑनलाईन एक खिडकी प्रणाली' - २७ दिवसांत परवाना
'इज ऑफ डुइंग बिझनेस' अंतर्गत आणखी एक महत्त्वाचे पाऊल
मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेने 'इज ऑफ डुइंग बिझनेस'चा भाग म्हणून आपला कारभार अधिक उद्योगस्नेही, पारदर्शक आणि अपेक्षित नियामक सुधारणांचा अंदाज बांधता येईल यादृष्टीने करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या अंतर्गत व्यवसाय परवाना मिळण्यासाठी 'ऑनलाईन एक खिडकी प्रणाली' सुरु केली आहे याद्वारे व्यवसाय परवाना मिळविण्यसाठी करावे लागणारे अनेक अर्ज एकाच अर्जात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या प्रणालीच्या पहिल्या टप्प्यामध्ये हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट या वर्गवारीसाठी व्यवसाय परवाना प्र॑क्रिया ऑनलाईन सुरु करण्यात आलेली आहे.
एखाद्याला नव्याने हॉटेल्स / रेस्टॉरन्ट सुरु करायचे असल्यास आतापर्यंत आरोग्य, अनुज्ञापन, दुकाने व आस्थापना खाते, अग्निशमन विभाग अशा पालिकेच्याच विविध यंत्रणांकडून परवाना, ना - हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागत होते. त्यासाठी संबंधित यंत्रणांकडे स्वतंत्रपणे अर्ज करावा लागत होता. आता पालिका प्रशासनाने यासर्व बाबींसाठी एकच अर्ज विकसित करुन तो लागू केला आहे. हा अर्ज पालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर 'Online Sevices – New Business Application' या शिर्षकाखाली उपलब्ध आहे. इच्छुकांना महापालिकेच्या कार्यालयात न येता, कोणत्याही ठिकाणावरुन हा अर्ज ऑनलाईन भरता येणार आहे या अर्जासोबत संबंधित कागदपत्रे अपलोड करता करता येणार आहे आरोग्य, अनुज्ञापन, दुकाने व आस्थापना खाते, अग्निशमन विभागांकडून अंतर्गत यंत्रणेतून त्यांचे परवाने / ना - हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन इमेलद्वारे मिळणार असून संबंधित विभागांचे काही निरीक्षण असल्यास, अर्जात काही त्रुटी असल्यास त्याच्या पूर्ततेसाठी अर्जदाराला त्यांनी दिलेल्या नोंदणीकृत इमेल / व मोबाईल द्वारे कळविण्यात येणार आहे अर्जात काही त्रुटी आढळल्यास अर्ज मिळाल्यापासून १५ दिवसांत अर्जदारास कळविणे बंधनकारक असणार आहे तसेच गरजेनुसार मागीतलेली पूरक माहिती पुन्हा अपलोड करता येणार आहे आणि संबंधिताला व्यवसाय परवान्यासाठी आकारलेले शुल्क व त्यासंबंधीची माहिती ही इमेल / व मोबाईल द्वारे कळविली जाणार आहे जाईल.हे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा परवाना ऑनलाईन देऊन त्याची प्रत नोंदणीकृत इमेलवर पाठविली जाणार आहे
व संबंधित विभागाने ही प्रक्रिया कार्यालयीन कामकाजांच्या २७ दिवसांत पूर्ण करणेही बंधनकारक असणार आहे पुढील टप्प्यामध्ये इतर सर्व व्यवसाय परवाने / परवानग्या या 'ऑनलाईन एक खिडकी प्रणालीच्या' 'New Business Application' मार्फत देण्याचा निर्णय घेतला आहे
Post a Comment