नरिमन पॉइंट ते अंधेरी सिप्झपर्यंत धावणाऱ्या मेट्रो-३च्या कारशेडसाठी आरे वसाहतीची जागा निश्चित करण्यात आली आहे. मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात कारशेडसाठी जागेचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. आरेच्या एकूण जागेपैकी ३३ हेक्टर जागा मेट्रो कारशेड, वर्कशॉप, वाणिज्य सी १ वापरासाठी आरक्षित करा असा प्रस्ताव नगर विकास विभागाने महापलिकडे पाठवला आहे. नगर विकास विभागाने केलेल्या सुचने प्रमाणे महानगर पालिकेने आरे मधील आरक्षणात बदल करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीसमोर सादर करण्यात आला. या प्रस्तावावर शिवसेना आणि कॉंग्रेस विरोध करणार असणार असल्याने भाजपाच्या उज्वला मोडक यांनी आरेला भेट द्यायची असल्याने सदर प्रस्ताव पुढे ढकलण्याची मागणी केली.
तर कॉंग्रेसचे अशरफ आझमी यांनी मुंबईमध्ये मोकले भूखंड 6 ते 8 टक्के असायला हवे होते परंतू आता फ़क्त दिड ते दोन टक्केच जागा मोकळी राहिली आहे. सर्वत्र सीमेंटचे जंगल उभे राहिले आहे. वातावरणाबरोबर छेड छाड़ केली जात असल्याने मुंबईचे तापमान 40 डिग्री पर्यंत गेले आहे. आरेच्या हरित पट्ट्यामधील जागेवरील झाडे तोड्ल्यास तापमानात आणखी वाढ होणार असल्याने आपण पुढील पिढीला आपण काय देणार आहोत याचा विचार करावा. मेट्रो साठी प्लानिंग कमिटीने सात जागा सुचवलेल्या असताना फ़क्त आरेसाठी आग्रह का धरला जात आहे. या सात जागा कोणत्या ? कांजुरची जागेचा प्रस्ताव होता मग त्यावर विचार का झाला नाही ? याची माहिती समितीला द्यावी अशी मागणी
अशरफ आझमी यांनी केली. दरम्यान भाजपाने व्हिजिटची मागणी अनंत नर यांनी मंजूर केली.
चौकट
व्हिजिटने काय फरक पडत नाही ……
आरेची जागा मेट्रोला देण्यास शिवसेनेचा विरोध होता आजही आहे आणि या पुढेही राहणार आहे. समितीच्या बैठकीत एखाद्या सदस्याने व्हिजिटची मागणी केली तर व्हिजिट द्यावी लागते. त्याप्रमाणे भाजपाची व्हिजिटची मागणी माण्य करण्यात आली. आज पर्यंत अश्या व्हिजिट करून कोणतेही निर्णय बदलले नाहित. आरेची जागा मेट्रोला देण्यासाठी विरोध यापुढेही कायम असेल...
अनंत नर सुधार समिती अध्यक्ष
Post a Comment