आरेमधील रहिवाशांसाठी एसआरए योजना राबविणार
भाजपाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – जोगेश्वरी येथील रेल्वे हद्दितील झोपडपट्टीमधील रहिवाशांना माहूल येथे कायमस्वरूपी घर देण्यात येईल, तसेच आरेमधील झोपडपटृीधारकांसाठी एसआरए योजना राबविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपाच्या शिष्टमंडळाला दिली.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये राज्यमंत्री विद्या ठाकूर, भाजपा नगरसेविका उज्वला मोडक यांचा समावेश होता. यावेळी जोगेश्वरी इंदिरा नंगर तसेच गोरेगाव येथील रेल्वे हद्दितील झोपडयांचा विषया मांडण्यात आला. या भागातील रेल्वे हद्दितील झोपडयांवर कारवाई करण्यात येत असून त्यांना बेघर होण्यावी वेळ आली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये रोष असून अनेकजण तात्पुरता निवारा म्हणून मंदिर आणि परिसरात राहत आहेत. या रहिवाशांपैकी ज्या झोपडपटीधारक पात्र आहेत त्यांना कायमस्वरूपी घर देऊन त्यांचे पुर्नवसन करण्यात यावे अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. ती मान्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रहिवाशांना माहुल येथे कायमस्वरूपी घरे देण्यात येतील असे सांगितले.
तसेच आरेच्या परिसरात अनेक घरे व झोपडपटृटी असून त्यांना रस्ते, विजेचे खांब, पाण्याच्या लाईन अथवा अन्य प्राथमिक सेवा सुविधा पुरवायच्या झाल्यास वन खात्याचे नियम व कायदे आड येतात. त्यामुळे हे रहिवाशी अनेक सुविधांपासून वंचित आहेत. यांच परिसरात नव्या विकास आराखडयांत घरांसाठी जागा आरक्षीत करण्यात आली असून या जागेवर या रहिवाशांसाठी एसआरएच्या धर्तिवर पुर्नविकासाची योजना राबविण्यात यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. ती मान्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना येत्या तीन महिन्याम याबाबत सर्वे करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला गृहनिर्माण राज्य मंत्री रविंद्र वायकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Post a Comment