पालिका प्रशासनाकडून नालेसफाईचे खोटे दावे - मनसे गटनेते दिलीप लांडे यांचा आरोप

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिका प्रशासनाकडून २८ टक्के नालेसफाई झाल्याचे सांगितले जात असले तरी वस्तुस्तिथी नेमकी उलटी असून एल विभागातील काही नाल्यांचे सफाईसाठी कार्यादेश देऊनही कंत्राटदारांकडून अद्यापपर्यंत कामास सुरुवातच झाली नसल्याचा आरोप मनसेचे गटनेते व एल प्रभाग समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे यांनी केला आहे. 

दिलीप लांडे यांनी एल विभाजगातील नाला क्रमांक १० , ११ १३ तसेच साकीनाका नाला , सफेद पूल नका , प्रीमियर कॉलोनी नाला , विनोबा भावे नगर नाला , संजय नगर नाला , किडणी गावदेवी नाला या सर्व नाल्यांचा पाहणी दौरा केला यावेळी अनेक नाले कचऱ्याने तुडुंब भरल्याचे दिसून आले . तर यातील संजय नगर नाला , किरोळ गाव नाला आणि गावदेवी नाल्याचे कामच सुरु नसल्याचे दिसून आले. , नाल्याची अवस्था बघितल्यानंतर पावसापूर्वी हे सर्व नाले संपूर्णपणे साफ करून घेण्याचे आदेश लांडे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.सादर पापाःनी दौऱ्यात वेळ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबी कार्यकारी अभियंता पर्जन्य जलवाहिनी दाभोलकर , प्रमुख अभियंता राठोड , दुय्यम अभियंता पर्यन्य जलवाहिनी बोधलकर तसेच संबंधित खात्याचे अधिकारी उपस्तिथ होते.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget