मुंबईत काही ठिकाणी पावसाची हजेरी

भायखळा, शीव, घाटकोपर, पवई, वरळी आदी भागामध्ये पाऊस
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – गेल्या तीन चार महिन्यापासून कडक उकाड्याने हैराण झाले आहेत घामाच्या धारा वाहत आहेत येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून राज्यामध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असताच आज सोमवारी मुंबईत पावसाने झलक दाखवली. मुंबईच्या काही भागात पावसाचा हलकासा शिडकाव झाला. त्यामुळे घामाने चिंब झालेले मुंबईकर थोडावेळ का होईना सुखावले.

मुंबईत आज सोमवारी संपूर्ण दिवस दमट वातावरण होते मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत पूर्ण महिनाभर उन्हाच्या चटक्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. त्यामुळे घामाघूम झालेले मुंबईकर पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा करीत आहेत. सोमवारी सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण होते. पावसाची चाहूल मुंबईकरांनी लागली, आणी काही क्षणात पावसाने हलकासा शिडकावही केला. मुंबईतील पवई, भायखळा, मस्सिद बंदर, वरळी, भाईंदर, घाटकोपर, शीव, कांजूर, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर येथे पावसाने शिडकाव करून पाऊस येणार याची मुंबईकरांना चाहूल देऊन गेला. पावसाच्या शिडकावा व त्यामुळे हवेतील काहीशा गारव्यामुळे मुंबईकर सुखावले. रिमझिम पावसांत घामाघूम झालेले मुंबईकर सुखावले. अनेक वसाहतीतील इमारती खाली बच्चे कंपनीने एकत्र येऊन पावसाचा आनंद लुटला. पाऊस येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यभरासह मुंबईत मान्सून धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाच पाऊस झलक दाखवत वेळेत आगमनाची चाहूल देऊन गेल्याने मुंबईकरही पावसाच्या स्वागतासाठी तयार झाले आहेत. पावसात लागणा-या छत्र्या, रेनकोट, ताडपत्र्या आदी पावसाळी वस्तू विक्रीसाठी व्यापा-यांनीही लगबग सुरू केली आहे. शिवाय मुंबईकरही यासाठी तयारीला लागल्याचे चित्र मुंबईत अनेक ठिकाणी बघायला मिळाले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget