भाजपाने अनिल दवे यांचा शोक प्रस्ताव घेऊन स्थायी समिती सभा तहकूब करण्यास शिवसेनेला भाग पाडले

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – देशातील राज्यातील किंवा शहरातील अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या निधनानंतर मुंबई महानगरपालिकेच्या विविध वैधानिक समितीच्या बैठकांमध्ये तसेच सभागृहामध्ये शोकप्रस्ताव आणून बैठका तहकूब केल्या जातात. परंतू केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांच्या निधनाबाबत महापालिकेतील स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात येणार नसल्याचे समजताच भाजपच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी समिती अध्यक्षांची भेट घेऊन शोकप्रस्ताव आणून सभा तहकूब करण्यास भाग पाडले आहे.

१८ मे ला केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचे निधन झाले. दवे यांच्या निधनानिमित्त तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला. नियमाप्रमाणे व पालिकेतील प्रथेप्रमाणे दवे यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी स्थायी समितीची बैठक असल्याने दवे यांच्या निधनानिमीत्त शोक प्रस्ताव मांडून सभा तहकूब करायला पाहिजे होती. मात्र या सभेत शिवसेनेच्या प्रतिष्टेचा राणीबाग, पेंग्विन पाहण्याच्या शुल्क वाढीचा प्रस्ताव असल्याने शिवसेना बैठक तहकूब करण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यातच भाजपाचे गटनेते मनोज कोटक या बैठकीला उपस्थित नव्हते. यामुळे भाजपाच्या एका केंद्रीय मंत्र्याच्या निधनाचा शोक म्हणून स्थायी समिती बैठक तहकूब करावी यासाठी भाजपाच्या प्रभाकर शिंदे, माजी उप महापौर अलका केरकर,राजश्री शिरवडकर, विद्यार्थी सिंग यांनी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांची भेट घेऊन बैठक तहकूब करण्यासाठी दबाव आणला. यावेळी आधीच शिवसेना आणि भाजपाचे वैर असल्याचे लोकांसमोर असताना आता भाजपाच्या एका केंद्रीय मंत्र्यांसाठी बैठक तहकूब केली नाही असा सर्व लोकांपर्यंत संदेश जाईल. यामुळे सभा तहकूब करावी असे भाजपा सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या निदर्शनास आणले. यावर स्थायी समिती अध्यक्ष व सभागृह नेते यशवंत जाधव यांनी भाजपा सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अनिल दवे यांच्या सह अभिनेत्री रिमा लागू यांच्या निधनाबाबत शोक प्रस्ताव सादर करून स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली. महानगर पालिकेतील भाजपाचे महापालिकेतील गटनेते असलेल्या मनोज कोटक यांच्याशिवाय हलत नाही असे समीकरण असल्याची चर्चा असताना मनोज कोटक रजेवर असताना भाजपाच्या इतर सदस्यांनी आपली पहारेकरांची भूमिका चोख पार पाडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget