अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिकेचे सहाय्यक आयुक्त निलंबित

मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जात असली तरी या नगरीत अनधिकृत बांधकामाचा पेव दिवसेंदिवस होत असतो मात्र या बांधकामाना संरक्षण देणा-या अधिकाऱ्यांवर पालिका तशी कारवाई करताना दिसत नाही अनधिकृत बांधकामे थांबवण्यासाठी उपाय योजना आखल्या पण अजूनही अनधिकृत बांधकामे थांबलेली नाहीत या बांधकामाना जबाबदार असलेल्या अधिका-यांवर कडक कारवाई करण्यासाठी पालिका आता पुढे सरसावली आहे घाटकोपरच्या 'एन' विभागाचे सहाय्यक आयुक्त सुधांशू द्विवेदी यांना अवैध बांधकामांना संरक्षण दिल्याप्रकरणी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी निलंबित केले आहे.

घाटकोपर येथील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या एन विभागाचे सहाय्यक आयुक्त सुधांशु द्विवेदी यांना सोमवारी तडकाफडकी पालिकेच्या सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकाऱ्याला निलंबन करण्याची ही पालिकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिल्यास सहाय्यक आयुक्तांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी काही महिन्यांपूर्वी दिला होता. त्याची सुरूवात घाटकोपर येथील सहाय्यक आयुक्तांच्या निलंबनापासून झाली आहे.पालिका अधिनियम 304 नुसार रस्ते घोषित करायचे असतात. त्याबाबत द्विवेदी यांनी आयुक्त अजोय मेहता यांना अर्धवट माहिती दिल्याचे उपायुक्त नरेंद्र बर्डे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. याशिवाय घाटकोपरमधील अवैध बांधकामांना प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच पुनर्विकास आणि दुरूस्तीसाठी परवानगी नसतानाही काही बांधकामांना परवानगी दिल्याचे उघडकीस आले आहे.तसेच अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या सुधांशु द्विवेदी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार त्यांची तपासणी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. यासाठी पुढील चौकशी करण्यासाठीही समिती नेण्यात आली असून, ही समिती त्यांची गुन्हेगारी पाश्वभूमी तपासणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget