मनसेचा पराभव जिव्हारी : शिवाजी पार्कातील सेल्फी पॉईंट बंद

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरलेला दादर शिवाजी पार्कातील सेल्फी पॉईंट अखेर बंद करण्यात आला आहे. मनसेने हा सेल्फी पॉईंट सुरु केला होता.सेल्फी पॉईंटच्या देखभालीसाठी सीएसआर फंड उपलब्ध होत नसल्याचे हे बंद केल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे पालिका निवडणुकीत मनसेचा पराभव झाला असून, हा पराभव जिव्हारी लागल्यानेच सेल्फी पॉईंट बंद केल्याची चर्चा रंगली आहे.
दादर हा मनसेचे बालेकिल्ला म्हणून समजला जायचा. मनसेचे नगरसेवक येथून निवडून आले. यावेळी झालेल्या वॉर्ड रचनेत हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने संदीप स्वप्ना देशपांडे याना मनसेने उमेदवारी दिली होती. मात्र त्याविरोधात शिवसेनेने माजी महापौर विशाखा राऊत यांना उभे केले होते. देशपांडे आणि राऊत यांच्या मध्ये कडवी झुंज होऊन देशपांडे याना पराभव पत्करावा लागला . त्यामुळे दादरचा गड शिवसेनेनं ताब्यात घेतल्याने मनसेला मोठा हादरा बसलाय. विशेष म्हणजे या वॉर्डात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राहतात. त्यामुळे हा गड राखण्यासाठी मनसेने ताकद पणाला लावली होती. दादर येथील सेल्फी पॉईंट हा मुंबईतला पहिला सेल्फी पॉईंट समजला जायचा. त्यामुळे तरुणाईची गर्दी असायची. अखेर मनसेने सेल्फी पॉईंट बंद केल्याने तरुणाईचा हिरमोड झाला आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget