शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या गळ्यात पडणार माळ?

आज उमेदवारी अर्ज दाखल करणारमुंबई, शुक्रवार (प्रतिनिधी)- मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी शर्यत लागली असताना मुंबईचे महापौर म्हणून शिवसेनेच्या मंगेश सातमकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडे संख्याबळ अधिक असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी तटस्थ तर मनसे शिवसेनेच्या बाजूने कौल देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र, भाजपनेही मनसेला आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविल्याचे समजते.
मुंबई महापौर पदाची निवडणूक येत्या 8 मार्चला होत आहे. अवघे चार दिवस शिल्लक राहिले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेला पाच पैकी चार अपक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. यामुळे शिवसेनेच्या जागांची संख्या 88 झाली आहे. तर भाजपच्या गोठात पाचवा अपक्ष व अभासेच्या गीता गवळी दाखल झाल्याने भाजपची संख्या 84 वर पोहचली आहे. त्यामुळे सध्या तरी शिवसेनेच्या जागा जास्त असल्याने शिवसेनेचा महापौर होऊ शकतो, असे चित्र आहे. मात्र अजून चार दिवस शिल्लक असल्याने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपचीही जोरदार रणनिती सुरू आहे. तर काँग्रेसनेही आपला उमेदवार उभा करणार असून, राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी पुढे प्रस्ताव ठेवला आहे, असे काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. मनसेनेही उमेदवार उभा करण्याचे ठरवले आहे. काँग्रेस व मनसेने उमेदवार उभे केल्यास फायदा शिवसेनेलाच होणार आहे. मात्र अजूनही चार दिवस शिल्लक असून मनसे काय भूमिका घेणार हे महत्वाचे आहे. भाजपला संख्या गाठण्यासाठी पाच नगरसेवकांची आवश्यकता आहे. एेनवेळी घोडेबाजार झाल्यास समिकरण बदलू शकतात. मात्र, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी तटस्थ भूमिका घेणार असून मनसेने शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला महापौर पद मिळू शकते, अशी माहिती सुत्रांनी दिली.

शिवसेना, भाजप, काँग्रेस व मनसेचे उमेदवार रिंगणात
महापौर पदाच्या रिंगणात शिवसेनेकडून मंगेश सातमकर यांना उतरवले आहे. उद्या ते अर्ज भरण्यासाठी पालिकेत येणार आहेत. भाजपकडूनही प्रशाक गंगाधरे किंवा शिंदे यांना अर्ज भरणार असल्याचे समजते. मात्र, हा उमेदवार शेलार गटाचा नसेल अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात आले. काँग्रेस रवी राजा किंवा आशिफ झकेरिया, मनसेतर्फेही उमेदवार उभा केला जाणार आहे. काँग्रेस, मनसेने उमेदवार उभे करण्यासाठीची औपचारिकता असणार आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget