मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत साहित्यिक डॉ कृष्णा किरवले यांच्या कोल्हापुरात झालेल्या हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अविनाश महातेकर, गौतम सोनवने, शिला गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. डॉ कृष्णा किरवले यांच्यावरील हल्ला हा पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीवरील हल्ला आहे. आंबेडकरी विचारवंतांच्या हत्येने आंबेडकरी विचार संपू शकत नाही विचारवंतांची हत्या होणे ही महाराष्ट्राच्या सामाजिक लौकिकाला काळिमा फासणारी घटना आहे. याचा रिपाइंतर्फे निषेध करण्यात आला. डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येची सीबीआय तर्फे चौकशी व्हावी आणि मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा करावी, आरोपीना अटक करून फाशीची शिक्षा करावी अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्या मान्य झाल्या नाही तर रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
Post a Comment