देशविरोधी जिहादी विरोधांत केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी - डॉ. सतीश मोढ

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – देशाची सुरक्षा आणि राज्यातील देशविरोधी जिहादी विरोधांत केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांतचे संघचालक डॉ. सतीश मोढ यांनी केली. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना प. बंगाल मध्ये जिहादी कारवाया जास्त प्रमाणात वाढलेल्या असुन तेथील सरकार या घटनेकडे लक्ष घालत नाहीत. प. बंगाल येथील राज्य सरकार राष्ट्रभक्तीचे संस्कार करणाऱ्या शाळा बंद करण्याची धमकी देते. दुसरीकडे कुख्यात सीमुलिया मदरशांसारख्या कंट्टरपंथी व जिहादी प्रशिक्षण देणाऱ्या हजारो संस्थाकडे दुर्लक्ष करत आहे असे मोढ म्हणाले. भारताच्या फाळणीच्या वेळी हिंदू क्षेत्र म्हणून पश्चिम बंगाल राज्य अस्थीत्वात आले. पाकिस्तान व बांगलोदशात होणाऱ्या अत्याचारा मुळे हिंदू नागरीक मोठया संख्येने प. बंगाल राज्यात शरणार्थी म्हणून आले आणि त्यांना समाविष्ठ करून घेतले. त्यावेळी हिंदू लोकसंख्या १९५१ साली ७८.४५% होती.२०११ साली झालेल्या जनगणनेत ही लोकसंख्या ७०.५४% ऐवढी कमी झाली आहे. आर एस एस कट्टरपंथी हिंसाचार व राज्य सरकारच्या मुस्लीम धोरणांची कठोर शब्दात निंदा करत आहे. राष्ट्राचे ऐक्य व अखंडतेसाठी ही बाब गंभीर इशारा असल्याचे मोढ यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget